निष्ठावंतांची खाट पाडणारा नेता / संपर्क नेता : गुरूनाथ खोत !
दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
अंबरनाथ: आज एका मोठ्या परंतू कद्रू नेत्यावर बोलन्याचि नामुष्की माझ्यावर आली आहे. प्रोटोकॉलच्या नावाखाली एकेका निष्ठावंत शिवसैनिकाची खाट पाडण्यात तरबेज असलेला अतिशय अकार्यक्षम, नेता कल्याण लोकसभेवर लादला गेला, तेव्हापासून या लोकसभा व त्या अंतर्गत येणा-या विधानसभा मतदार संघांची वाताहात लागली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमकुवत करण्याची सुपारी घेऊनच हा कामगार नेता आला आहे की काय ? असे त्यांचे वर्तन आहे.
या मतदार संघातील पदाधिकारी नेमणुक करताना खोत यांच्या मानेवर असलेला “जू” त्यांना निर्णय घेऊ देत नाही. उल्हासनगर व अंबरनाथ मतदार संघातील नेमणुकी या खोतांनी रोखून धरल्या. अनेक निष्ठावंतांना डावलले. लोकसभा निवडणुकीपुर्वी तत्कालिन कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे हे मिंधेंच्या दबावतंत्रास बळी पडून मिंधे गटात गेले. त्यांना मी गद्दार म्हणणार नाही. आपल्या कन्येची व जावयाची जेलवारी टाळण्यासाठी ते नाईलाजाने गेले. नवीन व्याखेप्रमाणे ते खुद्दारच ठरतील. जर त्यांना या संकटातून पक्षाने बाहेर काढले असते तर ते कदापि मिंधेला शरण गेले नसते.
ऐन लोकसभा निवडणुका समोर असताना या लाचार व अकार्यक्षम खोतांनी कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख नेमण्याची हिंमत दाखवली नाही. कल्याण लोकसभा निवडणूक कप्तानाच्या अनुपस्थित लढवली गेली. कल्याण लोकसभेचा पराभव हा खोतांसारख्या पराभूत मानसिकतेच्या नेत्यांमुळेच झाला.
याच गुरूनाथ खोतांनी एका विशिष्ट गटाची हुजरेगिरी करीत पदाधिकारी नेमताना पक्षपातीपणा केला व दुस-या गटातील इच्छूकांना डावलले. त्यामुळे उल्हासनगर कॅम्प नंबर पाच तसेच अंबरनाथ पुर्वेतील असंख्य पदाधिकारी व महिला/ पुरूष शिवसैनिक मिंधे गटात गेले.तोच प्रकार डोंबिवलीतही झाला.या सर्वांचा परिणाम बिनीच्या शिलेदारांची नाराजी दूर करून पक्षात टिकवून ठेवण्यात गुरूनाथ खोत या कणाहिन व लाचार नेत्यास अपयश आल्याने पराभव पत्करावा लागला. त्यापुर्वी याच गुरूनाथ खोतांनी डॉल्फिन क्लब या हॉटेलात मिटींग ( की सेटिंग ?) करून शिवसेना,अपक्ष,भाजपा असा द्राविडी प्राणायाम करणा-या राजेश वानखेडे याचा पक्ष प्रवेश घडवून अंबरनाथ विधान सभेच्या आमदारकीचा उमेदवार म्हणून अभिषेक करवून घेतला. त्यांना आयतीच दुसरी एक “गाय” मिळाली. काल परवा तर त्यांनी दीपेश म्हात्रेला पक्ष प्रवेश देण्यास भाग पाडून डोंबिवलीची उमेदवारीही गळ्यात टाकली. खोतांच्या हाती आत्ता पर्यंत देशी गायीच लागल्या होत्या.आता तर “जर्सी गाय” मिळाली. एकंदरीत हे खोत युनियन लिडर सारखेच वागत आहेत. सेटलमेंट, तह, तडजोडीचे बाळकडू पिऊनच ते संपर्क नेते पदावर पोहचले आहेत.
गेल्या ४ महिन्यांपासून उल्हासनगर पश्चिमचे शहरप्रमुख पद रिक्त आहे. पिंकी भूल्लर यांचे निधन झाल्यापासून गेल्या ४ महिन्यांत या पदावर नियुक्तिच केली गेली नाही. या उलट इच्छूक शिवसैनिकांना दाणे टाकून झुंजवत ठेवले आहे. या विभागात सुरेश पाटील हे एक कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक शहर प्रमुख पदासाठी पात्र व इच्छूक आहेत. हो,हा तोच सुरेश पाटील ज्याने गद्दारीच्या नंतर खासदार श्रीकांत शिंदेंचे ऑफिस फोडले होते,हो, हा तोच सुरेश पाटील ज्याने मिंधेकडे न झुकता तब्बल दीड वर्षे तडिपारी भोगली. त्यावेळी हाच खोत हात चोळत बसला होता परंतू त्याची तडिपारी रद्द करवून घेऊ शकला नाही. शेवटी तो दीड वर्षानंतर कसाबसा स्टे मिळवून शहरात आला.लोकसभा निवडणुक प्रचारात त्याने व त्याची पत्नी मंगला पाटील यांनी प्रचारात झोकून दिले पोलीसी दडपशाही झुगारली.
अशा निष्ठावंताला शहर प्रमुख पद देण्यास गुरूनाथ खोत टाळाटाळ करीत आहेत . प्रोटोकॉलचा बागुलबुवा करीत आहे. सुरेश पाटील ला शहर प्रमुख पद द्यावे ही मी व्यक्तिश: विनंती करूनही खोत निर्णय घेताना शेपुट वाकडेच करत आहे. तुम्ही इतर पक्षातून फुटून शिवसेनेत येणा-यास शहर प्रमुख पद देण्याचे मनसुबे रचत असाल तर गुरूनाथ खोत मी तुमचा मुलाहिजा न ठेवता, खरडपट्टी काढेन, त्याची जबाबदारी तुमचीच असेल. तुम्ही निष्ठावंतांना डावलून तुमचे दुकान सुरू ठेऊ पाहत असाल तर मग त्याचे परिणामही भोगायला तयार रहा !
एकीकडे अंबरनाथ विधानसभा मतदार संघात डॉ. बालाजी किणीकर यांना बहाल करण्याची तुमची खेळी आम्ही पाहत आहोत. आम्ही निष्ठावंत निखारे आहोत आम्ही राख होऊ पण त्यावेळी तुमच्या सारख्या सौदागरांची पण राख करू हे विसरू नका !
आम्ही निष्ठावंत आहोत व अखेर पर्यंत राहणार परंतू आम्हाला मुर्ख समजू नका ! ब-या बोलाने निष्ठावंतांना न्याय द्या आणि ही हुजरेगिरी व मुजरेगिरी थांबवा !