आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाची दाखल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेशी लढा देण्याची सर्वात मोठी जबाबदारी राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर होती. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाची दाखल विरोधकांनीही घेतली होती. कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांच्या आई गंभीर आजारी होत्या. अशावेळी आईच्या आरोग्याची काळजी घेत टोपे सातत्यानं कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. त्यांनी लोकांचे जीव वाचवण्याला पहिली प्राथमिकता दिली होती. याच दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र, खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही टोपे यांना चांगल्या कामाचं प्रशस्तीपत्र दिलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेसाहेब हे डॉक्टर नाही ते इंजिनिअर आहेत. टोपे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चोखपणे काम करतात. मात्र, कोरोनाच्या काळात टोपे यांनी जे काम केलं ते कौतुक करण्याजोगे आहे, अशा शब्दात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी टोपे यांचं कौतुक केलं आहे. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारनं चांगलं काम केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे आभार. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे आणि हे मी नाही तर केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगत असल्याचंही खा. सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.