निलेश पुरोहित सीए इंटरमीडिएट परीक्षेत उत्तीर्ण…
मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने सत्कार…
पुसद :- नुकत्याच लागलेल्या परीक्षेच्या निकाला नुसार निलेश रितेश पुरोहित ह्याने सी.ए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण केली आहे . त्या निमित्त त्यांचे मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे .निलेश हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साप्ताहिक पॉलिटिक्स स्पेशल पुसद यांचे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांचा मुलगा आहे . निलेशच्या या यशस्वी यशा करिता त्याला त्याच्या भावी वाटचाली करीता सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कार करते वेळी शकील बागवान , युवा नेते फिरोज खान , संतोष आंभोरे , अमजद खान , अब्दुल रहेमान चव्हान , महेश मांडवगड़े आदि मंडली उपस्थित होती..







