रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्रमदानातून म.गांधी यांची जयंती साजरी
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.२
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन.सी.सी.विभाग यांचे वतीने २आॅक्टोंबर रोजी म.गांधीजी यांची १५०वी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्ञी यांची जयंती महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवक यांनी महाविद्यालयातील परीसरातील स्वच्छता, श्रमदानातून करत साजरी करण्यात आली.
यावेळी म.गांधीजी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे प्रतिमाचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.
याप्रसंगी प्रतिमा पुजन झाल्यानंतर वेदिका कृष्णकांत मुळे या चिमूकलीने म.गांधीजी यांचे कार्यावर मनोगत व्यक्त करून समस्त प्राध्यापक यांची मने जिंकली.
श्रमदानातून म.गांधीजी यांची जयंती साजरी केल्याने प्राचार्य व प्राध्यापक यांनी समाधान मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.नितीन गायकवाड,प्रा.आदाटे,प्रा.माधव उगीले,प्रा.बालाजी नगरे,प्रा.मोहन राठोड,प्रा.स्वाती बैनवाड,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर ,प्रा.राजा जगताप,प्रा.वैभव आगळे उपस्थित होते







