म.गांधीजी जयंतीदिनी वेदिका मुळे पाच वर्षाच्या चिमुकलीने भाषणातून जिंकली मने
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.३
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एन.सी.सी.विभाग यांचे वतीने २आॅक्टोंबर रोजी म.गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्ञीजी यांच्या जयंतीनिमित्त श्रमदानातून महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करून जयंती साजरी करण्याचे नियोजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी म.गांधीजी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे प्रतिमाचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.
याप्रसंगी प्रतिमा पुजन झाल्यानंतर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रा.सौ.एस.एस.फुलसागर यांची नूतन शाळा उस्मानाबाद येथे मोठ्या गटात शिक्षण घेणारी पाच वर्षाची नात वेदिका कृष्णकांत मुळे या चिमुकलीने कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक यांचे पुढे म.गांधीजी यांचे कार्यावर आठ मिनीटाचे मनोगत व्यक्त करून म.गांधीजींच्या कार्याची महती सांगीतल्याने समस्त प्राध्यापक यांची मने जिंकली.तिच्या धाडशी भाषणाचे कौतुक महाविद्यालयात झाले वेदिकाने समस्त प्राध्यापक यांचे बरोबर झाडू घेऊन स्वच्छताही केली.
श्रमदानातून म.गांधीजी यांची जयंती साजरी केल्याने प्राचार्य व प्राध्यापक यांनी समाधान मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.नितीन गायकवाड,प्रा.आदाटे,प्रा.माधव उगीले,प्रा.बालाजी नगरे,प्रा.मोहन राठोड,प्रा.स्वाती बैनवाड,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.डाॅ.एस.एस.फुलसागर,प्रा.सौ.एस.एस.फुलसागर मॅडम,प्रा.प्रतिमा मुळे,प्रा.डाॅ.संदिप देशमुख प्रा.राजा जगताप,प्रा.वैभव आगळे उपस्थित होते







