नाभिक समाज महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न..
स्री ही बाह्य सौंदर्याने नाही तर ती कर्म व कर्तव्यांने अधिक सौंदर्यवान असावी – हेमांगी पाटील
महिलांनी चुल व मुल या संकल्पनेतुन बाहेर येवून प्रगती साधावी-डाँ.भुमिका बिरारी
सासु-सुन यांनी आई- मुली सारखे जगावे व वागावे तरच समाजात घटस्फोट कमी होतील- प्रा.सपना बिरारी…
धुळे- जिल्हा नाभिक हितवर्धक संस्था महिला मंडळ व अखिल भारतीय जिवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच श्री. संतसेना मंगल कार्यालय देवपुर येथे नाभिक समाजाच्या महिलांसाठी प्रबोधन व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी केले. श्री.संतसेना महाराज यांचे प्रतिमा पुजन डाँ. भुमिका बिरारी व नगरसेविका सुमनताई वाघ यांच्या हस्ते केले, तसेच शुरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन, अखिल भारतीय जिवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटक रंजना सुर्यवंशी यांनी केले. स्री शिक्षणासाठी महान कार्य करनारी ज्ञानसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या सपना बिरारी यांनी केले.
या प्रसंगी नाभिक समाजातील बहुसंख्या महिलांनी उपस्थिती दिली महिलांनी आत्मनिर्भर बनुन आपल्या परिवाराला, समाजाला, व देशाला सक्षम करण्यासाठी पुढे यावे याकरीता नाभिक समाजाच्या महिलांसाठी प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणुन डाँ.भुमिका बिरारी, उप जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, प्रा. सपना बिरारी, रंजना सुर्यवंशी उपस्थित होते मान्यवरांनी प्रबोधनात्मक मनोगते व्यक्त केलीत. महिलांनी एकमेंकाना हळदी कुंकू ही उत्साहाने दिला
जेष्ठ मातांचा ही सत्कार करण्यात आला, मनोरंजनासाठी संगीत खुर्ची खेळ ही खेळण्यात आले, भेट वस्तुही देण्यात आले, अल्पउपहारांची व्यवस्थाही करण्यात आले होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. त्रिवेणी सोनवणे, मनिषा चित्ते, वैशाली सैंदाणे, सौ छाया महाले, संध्याताई सैंदाणे, अनिता सैंदाणे, ज्योतीताई महाले, भावना सोनवणे, कल्याणी ठाकरे, मिनाक्षीताई बोरसे, गीता खोंडे, प्रितमताई सुर्यवंशी आदी महिलांनी परिश्रम घेतले.क्षतसेच सुभाष शिरसाठ, दिनेश महाले, भगवान चित्ते, उमेश महाले, बापु सैंदाणे, सुधीर महाले, अमृत महाले, छोटू सोनवणे, राजु चित्ते, शंकर सैदाणे, मनोहर वारूडे, मनोज पगारे, वंसत चित्ते, मनोज बोरगावकर, आदींनी नियोजनासाठी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाभिक हितवर्धकच्या जिल्हाअध्यक्षा त्रिवेणी सोनवणे यांनी तर आभार जिवा सेनेच्या जिल्हाअध्यक्षा मनिषा चित्ते यांनी मानले….







