महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री व महिला व बालकल्याण मंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांचा ५१ वाढदिवस आटपाडीत उत्साहात साजरा.:-निवास पाटील
अपंग, निराधार, विधवा, गोरगरीब यांचे कैवारी माननीय नामदार श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा वाढदिवस प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा समन्वयक निवास पाटील तालुका आटपाडी यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.
अपंग गोरगरीब यांच्या हक्कासाठी प्रहार नेहमीच पुढाकार घेत असते.
अपंग,विधवा, निराधार यांची संजय गांधी निराधार पेन्शन ची कामे करणे, घरकुल, पिठाची चक्की, मिरची कांडप यंत्र यांचे प्रस्ताव भरण्यास मदत करणे, अपंगांच्या विविध अडचणीला त्यांच्या मदतीला धावून जाणे अशी कामे करतच आहेत. त्याच बरोबर दिव्यांगांना शासकीय आर्थिक अनुदानावरच न विसंबून राहता त्यांचा समाजातील सहभाग वाढावा व सामाजिक राजकीय सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगांनी उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी कित्येक वर्षे श्री.निवास पाटील अगदी इमानेइतबारे व उत्साहीपणे करत आहेत.
त्याचबरोबर त्यांनी बच्चु भाऊंचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा ठरविला. व एक महिन्याभरापूर्वीच अतितीव्र अपंगत्व असणाऱ्या ज्यांना व्हिलचेअरची आवश्यकता आहे अशा लोकांचा निवास पाटील यांनी सर्वे केला त्यावेळेस असे अनेक गरजू दिव्यांग आटपाडी तालुक्यात असल्याचे निदर्शनास आले.
परंतु या कोरोनाच्या महामारी मुळे व लॉकडाऊनमुळे अपंग- दिव्यांग यांना मदत करण्यास कोणीही पुढे येत नव्हते.
अशा वेळेस त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष मा.श्री. सुनील सुतार साहेब व प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख तसेच वज्रधारी न्यूजचे सर्वेसर्वा मा.श्री.दत्तकुमार खंडागळे यांना मदतीचे सहकार्य करण्याची विनंती केली. मा.बच्चुभाऊ वरचे असलेले प्रेम व दिव्यांगांविषयी असलेला आदर या भावनेमुळे माननीय सुनील सुतार साहेब व दत्तकुमार खंडागळे साहेब यांनी क्षणाचाही विलंब न करता साथ दिली व दोघांनी प्रत्येकी एकेक व्हीलचेअर देऊन सहकार्याची भावना जोपासली. व दिव्यांगांच्या प्रती बच्चु भाऊ यांची जी मदतीची भावना असते त्याचे प्रतिबिंब माननीय सुनील सुतार व दत्ता भाऊ खंडागळे यांच्या रूपाने सांगली जिल्ह्यात जाणवत असल्याचे निवास पाटील यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जास्त गर्दी न जमवता आटपाडीचे नायब तहसीलदार राजकुमार राठोड साहेब पोलीस अधीक्षक भानुदास निंभोरे साहेब व गट विकास अधिकारी एम.आर.भोसले साहेब यांच्या उपस्थित गरजू दिव्यांगांना व्हिलचेअर प्रदान केली. त्यावेळेस दिव्यांगांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. हा दिव्यांगांच्या चेहऱ्यावरचा आनंदच म्हणजे परमोच्च सुख असल्याची भावना निवास पाटील यांनी बोलून दाखवले.
व या सुखाचा आनंद घेण्यासाठी इथून पुढे जे गरजु व अतितीव्र अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांनी संपर्क साधावा त्यांना ही प्रहार च्या माध्यमातून मदत केली जाईल.
व ज्या काही दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या किंवा तीन चाकी सायकल मिळाले आहेत परंतु, ते वापरत नाहीत. सद्यस्थितीत त्या वस्तू पडून आहेत व गंजून खराब होणार आहेत आशा दिव्यांगांनी आपल्याशी संपर्क साधावा व त्या वस्तू या गरजू दिव्यांगांना देण्याची भावना ठेवावी, असे आवाहन निवास पाटील यांनी यावेळी केले.