माजी मंत्री महादेव जानकर यांचेकडून समाजरत्न फौंडेशनचे कौतुक
माणगंगा न्यूज जत:-
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर सांगली दौऱ्यावर असताना चोरोची ता.कवठेमहांकाळ येथे जनसेवक दत्ताभाऊ लोखंडे यांच्या ‘समाजरत्न फाउंडेशन’ जनसंपर्क कार्यालयाला येथे सदिच्छा भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष दत्ता (भाऊ) लोखंडे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व युवा कार्यकर्त्यांनी राजकारण, समाजकारण यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला हवा असे नमूद केले.
यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजितकुमार पाटील,सांगली जिल्हा युवक अध्यक्ष उमाजी चव्हाण,मार्केट कमिटी सांगलीचे माजी उपसभापती रमेश ( दादा ) साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माणिक यमगर,अजितभाऊ शिंगाडे, युवा कीर्तनकार हेमंत मराठे महाराज,अनिल सोलंकर , काका पाटील,धोंडीराम यमगर, किसन आवळे, योगेश लोखंडे,कृष्णदेव यमगर, सचिन नरुटे उपस्थित होते.