आटपाडीचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या दमदार कामगिरी बद्दल आरपीआयच्या वतीने सन्मान
आटपाडी तालुक्याचे तहसीलदार एस.डी मुळीक व नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करताना आरपीआयचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात व तालुका सरचिटणीस धनंजय वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यांमध्ये वाळूचा उपसा सुरू आहे दिवसात ढवळ्या वाळूची चोरी केली जाते. यामध्ये अनेक तरून बरबाद झाले झाले आहेत .तरीसुद्धा वाळू तस्करी जोमात सुरू आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी रात्रंदिवस पाळत ठेवून अनेक वाहने जप्त केली व वाळू तस्करी वर कारवाईचा बडगा उ गर ल्याने वाळू तस्करी वाल्यांच्या घबराट निर्माण झाली आहे.
तहसीलदार सचिन मुळीक व नायब तहसीलदार राजकुमार राठोड त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आज आरपीआयच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.