कांदा रोपे सोशल मिडियावर
तापी नदीच्या काठावर खालील शेतकऱ्यांची डोंगराळ भागात भटकंती
एक एकरासाठी मोजावे लागतात पन्नास हजार
त-हाडी.. अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल,उन्हाळं कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे कांदा अतिवृष्टीच्या पावसाने जमिनीच्या वरच न आल्याने व जमिनीतच सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे ,पण रुपेश शोधण्यासाठी शेतकऱ्यांना आधार मिळाला सोशल मिडियाचा .पावसाच्या तडाख्यातुन वाचलेल्या व डोंगराळ भागातील वाचलेल्या कांदा रोपांना शेतकऱ्यांनी व्हाटस अप, फेसबुकवर टाकुन त्याखाली आपला मोबाईल नंबर टाकुन घरबसल्या गिऱ्हाईक शोधले आहेत ,त्यामुळे शेतकरी कांद्याच्या लागवडीकरीता थांबला आहे
यावर्षी उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असले तरी शेतकरी मात्र कांद्यालाच पसंती देत आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी मात्र रोपे न कांद्याच्या लागवडीसाठी लाल ,उन्हाळं कांद्याच्या रोपांची शोधाशोध करत असुन मोठ्या प्रमाणावर रोपच खराब झालेली असतानाच किंचितच डोंगराळ, मुरमाड जमिनीवर रोपे वाचलेली रोपे ही महाग घ्यावी लागत आहे. ,
एक एकर कांदा रोपांसाठी पन्नास हजाराचा भाव फुटल्याने म्हणजे सोन्याच्या भावात रोपांची किमती झाल्याने शेतकरी कांदा रोपांसाठी भटकंती करत आहेत.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने गाव ,वाडी वस्त्यावर कांदा रोपांचाच विषय बोलला जात आहे.असल्याने शेतकऱ्यांना फक्त बाजारभाव ऐकायला मिळत आहेत, दीड दोन महिने पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या शेतात टाकलेले कांदा बियाणे पाणी साचल्याने सडून गेले,तर काही शेतकऱ्यांना पावसामुळे कांदा बियाणे टाकताच न आल्याने जमीन पडीक राहिल्या आहेत.
तर काही शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यावर कांदा बियाणे टाकल्याने साहजिकच कांदा लागवड उशिरा होणार आहे.
कांदा रोपांचे आगार
तापी काठावरील लाभक्षेत्राखालील जवळपास नव्वद टक्के रोपांचे नुकसान झाले, त्यामुळे शिरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वरुळ, भटाणे ,जवखेडा नवेलोढरे जुने लोढरे, त-हाडकसबे ,जळोद, ममाणे अभानपुर,विखरण, या भागात डोंगराळ व मुरमाड जमिनीवर तसेच लाल कांदा रोपे विक्रीला असल्याने या भागात शेतकरी रोंपाची शोधाशोध करत आहे.
कांद्याला फाटा, उन्हाळी मका लागवड
अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा रोपांची फसवत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा रोपांसाठी भटकंती करत आहे, परंतु आजचे उन्हाळं कांद्याचे बाजार भाव दिवसेंदिवस कमी होत चाललेले असून,कांदा रोपांचे बाजारभाव बघता अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मका, हरभरा,गहू या पिकांना पसंती दिली आहे, त्यामुळे भविष्यात कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
मी दोन पायली कांद्याचे बियाणे टाकलेले होते, परंतु अतिवृष्टीमुळे संपुर्ण रोप सडुन गेल्यामुळे सोशल मिडीया वर कांदयाचे रोप विक्रीस असलेल्या मेसेज ची चौकशी केली असता कांद्याच्या रोपाचे भाव देखील एकरी पन्नास हजार झाल्यामुळे कांद्याची लागणच अशक्य झाली आहे, याचा परिणाम भविष्यात कांद्याचे लागवडीवर होणार आहे .
नरेंद्र सोनवणे, शेतकरी त-हाडी
फोटो… शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील शेतकरी विशाल कंरके यांचे मुरमाड जमिनीवर आलेले रोप.







