भोरखेडा विद्यालयाचे खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
त-हाडी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद धुळे मार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिरपूर तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
यात विद्यालयाचा 17 वयोगटातील मुलांचा व्हॉलीबॉल संघ विजयी झाला तसेच 55 किलो कुस्ती गटात राज रविंद्र अहिरे प्रथम क्रमांक, गोळा फेक मध्ये -राज रविंद्र अहिरे प्रथम क्रमांक,लांब उडी -पाटील दिनेश प्रमोद प्रथम क्रमांक,19 वर्ष वयोगटात 5 की मी चालणे स्पर्धेत मुली प्रथम क्रमांक पूजा शंकरसिंग जाधव, द्वितीय क्रमांक संगिता गोपीचंद भिल, मुले प्रथम क्रमांक हितेश शिवाजी भिल,द्वितीय क्रमांक रितेश सुरसिंग भिल यांनी प्राप्त केला या विद्यार्थ्यांनची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली
संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी ,सी ई ओ डॉ उमेश शर्मा,प्राचार्य आर एफ शिरसाठ, यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक पी व्ही पाटील क्रीडा शिक्षक एस एस निकुंभे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले एस जे पाटील,जे डी पाटील,संग्राम राजपूत यांचे सहकार्य लाभले







