आदर्श विद्यालयातील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
त-हाडी २८- येथील उद्यान पंडित बापूसाहेब ग.द. माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंचे तालुकास्तरावर मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून शासकीय शालेय सर्व खेळ प्रकारांच्या स्पर्धा ह्या बंद होत्या. त्या शासनाने यावर्षी मंजुरी दिल्यानंतर दीपावली सुट्टीनंतर या स्पर्धांना सुरुवात झाली व विविध खेळ प्रकारांमध्ये विद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन करून जिल्हास्तरावर त्यांची निवड झालेली आहे.
नुकत्याच शिरपूर तालुका स्तर मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या त्यात विद्यालयाच्या खेळाडू १४ वर्षे वयोगटात ,सागर पावरा ६०० मीटर रनिंग मध्ये ,तृतीय व लांबउडी मध्ये द्वितीय ,क्रमांक प्राप्त केला, तन्मय मराठे हा १०० मीटर मध्ये तृतीय,तर १७ वर्षे वयोगटात कृष्णा माळी, उंच उडीत द्वितीय, कुणाल पाटील, तृतीय पियुष मराठे, उंचउडी मध्ये प्रथम, हातोडा फेक मध्ये अजित बेलदार , प्रथम, भोजराज माळी तृतीय, थाळीफेक मध्ये ,भावेश राजपूत ,तृतीय ,भालाफेक मध्ये, भावेश राजपूत, प्रथम १९ वर्षे वयोगटांमध्ये, विवेक राजपूत ,हातोडा फेक मध्ये प्रथम अशा विविध वयोगटातील खेळाडूंचे जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.
तर मुलींमध्ये १४ वर्षे वयोगटात छाया भरत भरवाड, १०० मीटर मध्ये, द्वितीय ,मयुरी अहिरे ,गोळा फेक ,मध्ये द्वितीय, वैष्णवी अहिरे ,लांबउडी द्वितीय, १७ वर्षे वयोगटात, हॅमर थ्रो मध्ये ,वैष्णवी बुवा, प्रथम, जागृती कलाल,द्वितीय, मनीषा शिरसाठ, गोळा फेक, मध्ये ,प्रथम थाळीफेक मध्ये द्वितीय, आरती पावरा थाळीफेक मध्ये प्रथम आकांक्षा मराठी तीन किलोमीटर चालनी मध्ये तृतीय भालाफेक मध्ये आरती पावरा द्वितीय तर १९ वर्षे वयोगटात गोळा फेक मध्ये पूनम बेलदार द्वितीय निकिता भिल थाळीफेक मध्ये प्रथम हॅमर थ्रो मध्ये, तेजस्विनी बुवा ,प्रथम, स्वाती कोळी, द्वितीय ,भालाफेक, मध्ये वर्षा वानखेडे, प्रथम, या खेळ प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंचे जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.
सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष, . दादासो मोहन द सोनवणे, कार्याध्यक्ष, राजीव सोनवणे ,तसेच सचिव, एडवोकेट बाळासो सुनील सोनवणे ,सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक . वाय व्ही. पाटील सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.







