मीडिया अकादमीने साजरा केला व्हर्च्युअल गुरुपौर्णिमा
सलाम बॉम्बे फाउंडेशन मधील मीडिया अकादमी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व्हर्चुअल गुरूपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून आपल्या गुरूंना गुरूवंदना देण्यात आली. आपल्या गुरूप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी द डिजिटल पोस्टर, डिजिटल ग्रीटिंग कार्ड ,फोटो कोलाज तसेच व्हिडिओ बनवले होते. या व्हर्चुअल कार्यक्रमात विविध शाळेतील शिक्षक वृंद देखील उपस्थित होते. गुरू पौर्णिमा दिनाचे औचित्य साधत मे महिन्यात ठेवलेल्या समर कॅम्प ऍक्टिव्हिटी २०२१-२२ चा निकाल देखील सांगण्यात आला तो खालीलप्रमाणे.
ग्रीटिंग कार्ड मेकिंग
१. स्वप्नाली कदम – साईनाथ नगर म. न. पा. शाळा
२. जुली गुप्ता – मानेकलाल मेहता म. न. पा. शाळा
३. सदाफ फातिमा – छत्रपती शिवाजी विद्यालय
इंस्टाग्राम रील मेकिंग
निधी शाह – टेम्बीनाका ठाणे महानगरपालिका
फोटोग्राफी ऍक्टिव्हिटी
१. सागर खेराडे – लायन्स पायोनियर हायस्कुल
२. श्रुष्टी जाधव – साधना विद्यालय
३. ह्रितिका यादव – अनुयोग विद्यालय – इंग्रजी माध्यम
४. विशाल शुक्ला – गुंदवली एम.पी . एस शाळा
५. साईराज कदम – भाऊसाहेब हिरे विद्यालय
पब्लिक रिलेशन कॅम्पिंग
१. कीर्ती पटवा – साधना विद्यालय
२. मीनाक्षी जामसांडेकर – विद्या विकास मंडळ विद्यालय
३. कविता चौधरी – साधना विद्यालय
४. भैरवी गडगे- साधना विद्यालय
अश्याप्रकारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चौधरी या मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी केली व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







