उन्हाळ कांद्याने बिघडले बळीराजाचे अर्थचक्र
आठ महिने साठवणूक करूनही पडताळ बसेना
शेतकऱ्यांना मिळतो सरासरी ६०० ते ७०० चा भाव
त-हाडी… शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा . या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण आठ महिने उन्हाळं कांदा साठवणूक करुनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला ? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे, कारण सुरुवातीला एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा काढला त्यावेळेसही शेतकऱ्यांना हाच दर मिळत होता, आणि आता आठ महिने कांदा साठवण करूनही वजनात घट, सडण्याचे प्रमाण, यामुळे ३०ते ४०टक्के घट येऊनही शेतकऱ्यांची पाहिजे अशी फडताळ बसत नसल्याने उन्हाळ कांदा साठवणूक करून शेतकरी मेटाकुटीस आला आहे, कारण गेली दोन वर्षापासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे ,
मध्यंतरी तीन हजारावर गेलेला उन्हाळ कांदा आठ महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी ६००ते ७०० दरानं विकावा लागत असले तरी शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात घट,सडण्याचे प्रमाण, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील रब्बी लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झाल्याने.शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा आठ महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणूकवर होणार आहे , साठवून ठेवलेल्या कांद्यातून चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला आहे, असुन पुढील पिके उभे करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.
याउलट शेतकऱ्यांनी साडेतीन महिन्यापूर्वी लागवड केलेला लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने त्याला पंधराशे ते दोन हजार दर मिळत आहे, अवकाळी पावसाने लाल कांद्याच्या लागवडी रोपांअभावी उशिरा झाल्या पण त्याचा परिणाम साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यावर झाला , लाल कांद्याच्या लागवडी उशिरा असल्यामुळे उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी टिकवून धरला पण कांदा टिकूनही त्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कांदा पिकाला दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने, वातावरणातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे लाल कांदा लागवडी उशिरा झाल्या पर्यायाने चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्यातून चार पैसे पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांनी होती , पण केंद्र शासनाचे कधी आयात तर कधी निर्यात या धोरणामुळे संभ्रमात सापडलेल्या शेतकऱ्यांचा कांदा मात्र भरडला गेला व आहे त्या भावात शेतकऱ्यांना उन्हाळ कांदा विक्री करावा लागत आहे
प्रतिक्रिया
भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली, पण आता उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात असून दिवसेंदिवस कांदा खराब होत असून तीन हजारावर गेलेला उन्हाळ कांदा सरासरी ६००ते ७०० रुपये भावाने विकला जात आहे, पण आठ महिने साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात वजनात घट, सडण्याचे प्रमाण, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे आता मिळत असलेल्या भाव मात्र शेतकऱ्यांना परवडणारा नाही , त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शरद भाईदास सोनवणे कांदा उत्पादक शेतकरी.







