• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वनसंवर्धनातून वसुंधरेची ‘इम्युनिटी पावर’ वाढवा निरंजन दिवाकर : जनता शिक्षण मंडळ विद्यालयात वनसंवर्धन दिन

माणगंगा by माणगंगा
July 24, 2021
in महाराष्ट्र
0
वनसंवर्धनातून वसुंधरेची ‘इम्युनिटी पावर’ वाढवा निरंजन दिवाकर : जनता शिक्षण मंडळ विद्यालयात वनसंवर्धन दिन

वनसंवर्धनातून वसुंधरेची ‘इम्युनिटी पावर’ वाढवा
निरंजन दिवाकर : जनता शिक्षण मंडळ विद्यालयात वनसंवर्धन दिन


पुसद,ता.२३


……………….
कोविड महामारीत इम्युनिटी पावरचे महत्व प्रत्येकाने जाणले आहे.वृक्ष ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत.वसुंधरेचा इम्युनिटी पावर वनराजीने वाढतो.त्यामुळे वसुंधरेला पर्यायाने मानव जातीला सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोठी गरज आहे. नागरिकांसह शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी मोठी भूमिका बजावू शकतात, असे विचार पुसद वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक निरंजन दिवाकर (आयएफएस ) यांनी व्यक्त केले.

वनसंवर्धन दिनानिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात शुक्रवार ता.२३ रोजी आयोजित कार्यक्रमात निरंजन दिवाकर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.माधवी गुल्हाने होत्या.यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण राऊत,वन सर्वेअर संतोष सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला गुरुपौर्णिमेनिमित्त निरंजन दिवाकर यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या आवारात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच टिळक जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.

दिवाकर पुढे म्हणाले की,जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे तापमान सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे.त्याचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या माध्यमातून जाणवत आहेत.कुठे अतिवृष्टी, कुठे ढगफुटी,महापूर,तर कुठे दुष्काळ पहावयास मिळत आहे.त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे.जागतिक तापमान वाढीवर उतारा म्हणजे जंगलक्षेत्र वाढविण्याची गरज आहे.भूभागाच्या ३३ टक्के जंगल आवश्यक आहे.यवतमाळ जिल्ह्यात केवळ १४ टक्के भूभाग जंगलाने व्यापला आहे.त्यामुळे वृक्षारोपणाचे महत्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित होते,असे दिवाकर म्हणाले.गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक कृतिशील बनवावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,याची जाणीव त्यांनी करून दिली.

वनपरिक्षेत्राधिकारी राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.शिक्षकांनी समाजाचा चांगला ब्रँड घडविणे काळाची गरज आहे, .भविष्यात कोविड पेक्षाही महासंकटाचा सामना करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणातून डॉ. माधवी गुल्हाने यांनी ग्लोबल वार्मिंग विषयक माहिती दिली व गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान केला.शिक्षक हा समाजाचा ‘आर्किटेक्चर’ आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर लोहटे यांनी केले.तर एस. एच.पाचकोरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Views: 175
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

महाविकास आघाडी सरकारून युद्ध पातळीवर सर्व जिल्हयातील पूरग्रस्तांना मदत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)