• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर परिसरातील भूखंड रक्षणार्थ ट्रस्टचे पालकमंत्र्यांना निवेदन

माणगंगा by माणगंगा
December 4, 2022
in महाराष्ट्र
0
पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर परिसरातील भूखंड रक्षणार्थ ट्रस्टचे पालकमंत्र्यांना निवेदन

पहूर येथील श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर परिसरातील भूखंड रक्षणार्थ ट्रस्टचे पालकमंत्र्यांना निवेदन

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर पहूर – शेंदूर्णी मार्गावर पहूर पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावरील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकास आणि जिर्णोद्धारासाठी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केलेल्या आजन्म भिक्षा झोळी संकल्पाद्वारे विविध विकास कामे होत असून मंदिरासमोरील खुला भूखंड रक्षणार्थ पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी दि.४/१२/२२ रविवार रोजी लेखी निवेदन दिले . .

जळगाव तालुक्यातील तरसोद येथील ब वर्ग दर्जा प्राप्त श्री क्षेत्र गणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ९५ लक्ष रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य भक्त निवासाचे लोकार्पण व राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत ४ कोटी ८९ लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ना . गुलाबराव पाटील यांना शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी सदर निवेदन सादर केले .
श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे शिवकालीन शिव मंदिर असून गेल्या ४० वर्षांपासून शिवभक्त रंगनाथ महाराज पुजारी म्हणून कार्यरत आहेत . १९९१ मध्ये त्यांनी ४२ दिवसांचे मौन अनुष्ठान करून लोकवर्गणीतून मंदिर उभारले . या मंदिरास धर्मादाय उपायुक्त ,जळगाव यांच्याकडून २३ जानेवारी २००६ रोजी ई १०८६ असा नोंदणी क्रमांक प्राप्त झालेला आहे .

दरवर्षी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते . हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा महादेव म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे . ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन २०१५ मध्ये मंदिरास क वर्ग दर्जा मिळालेला असून या तीर्थक्षेत्रास ब वर्ग मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अडीच कोटी रुपयांचा निधी श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर विकास कामांसाठी मिळणार असून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या माध्यमातून पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे .

येणाऱ्या काळात श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यामातून सर्व भाविक भक्त , लोकप्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी यांच्या सहकार्याने परिसरात विविध विकास कामे होत आहेत . आजन्म भिक्षा झोळी लोकवर्गणीतून सुरू असलेले मंदिर विकासाचे कार्य आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन पूजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी नामदार गुलाबराव पाटील यांच्याशी बोलताना केले .

Views: 272
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
१०वी – १२वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा सुरू

१०वी – १२वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)