ग्रामविकास अधिकारी आले कि कळवा एक हजार मिळवा
ग्रामपंचायतींची विकासकामांसह गावातील कामे रखडली
त-हाडी: ग्रामविकास अधिकारी आपल्या इच्छित स्थळावरुन अपडाऊन करतात,शिवाय त-हाडी ग्रामपंचायतचे आजतागायत त-हाडी ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. ग्रामविकास अधिकारी शहरवासी असल्याने दैनंदिन कामांचा तसेच विकासकामांचा खोळंबा होत असल्याचे चित्र सध्या त-हाडी ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळत आहे.
नागरिकांची कामे मार्गी लावण्यास सरपंच प्रभावी भूमिका बजावतात. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीकडे अनेक दिवस फिरकत नसले तरीही सरपंच वेळ मारून कामे पुढे रेटून नेतात.मात्र आता ग्रामविकास अधिकारी शहवाशी होऊन ते अपडाऊन बहाद्दर झाल्याने परिणामी त्यांच्या दौऱ्याचा ताळमेळ अजूनही बसलेला नाही. ग्रामविकास अधिकारी आठवड्यातून एकदा येतात येथील नेमणूक केलेले आजपर्यंत त-हाडी ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. प्रशासकांनी ग्रामसेवकांना तुम्हीच सांभाळून घ्या अस म्हणत सर्वाधिकार दिल्याचे काही अंशी दिसून येत आहे.
यामुळे त-हाडी गावातील विकासकामांसह अनेक कामे बाकी आहे आहेत.येथील ग्रामपंचायतीमध्ये जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, घराचा उतारा, घरकुल मस्टर, इतर कामेसह नागरिकांचे हाल होत आहेत न.याशिवाय उर्वरित कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकल्याने तेही कामे सोडून देण्याच्या मार्गावर आहेत.त्याच बरोबर पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा अनेक दिवसांपासून तसाच पडून असल्याने गावातील विविध विकास कामे खोळंबून पडली आहेत. ग्रामविकास अधिकारी जर गावाकडे येणार नसतील तर काय उपयोग ? गावाच्या उपयोगी न पडता केवळ वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे यामुळे त-हाडी गावाचा गावगाडा आता रामभरोसे सुरू आहे.
प्रतिक्रिया :
शिवराम पाटील. (ग्रामस्थ त-हाडी ) :त-हाडी ग्रामपंचायत मधील आजतागायत त-हाडी ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही.यामुळे गावातील अनेक नागरिकांची वारसाचे प्रमाणपत्र, ,,घराचा उतारा, ग्रामस्थांना मिळत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.प्रशासकाने नियमित येऊन ग्रामस्थांची अडलेली कामे करायला हवी.
प्रतिक्रिया
हि गेल्या ११ नोव्हेंबर २२ रोजी शिरपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी, व धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन दिले आहे तरी ही बदली होत नाही याचा अर्थ असा आहे की ग्रामविकास अधिकारी यांच्या वर गट विकास अधिकारी व धुळे
वेळोवळी भेट घेऊन ही फक्त आश्वासन मिळत
जयश्री सुनिल धनगर
लोकनियुक्त सरपंच त-हाडी