जवाहरलाल शेतकी विद्यालयाच्या विशाल सोलंकर याची तालुकास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जवाहरलाल शेतकी विद्यालयाच्या विशाल दुर्योधन सोलंकर याने सोलापूर जिल्हा क्रिडा कार्यालया मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटात व ६० किलो वजन गटात फ्री स्टाईल या प्रकारात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक संपादन केला.
या कुस्ती स्पर्धा बागेचेवाडी येथील लोकनेते स्व पै दत्ता वाघमारे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संग्रामनगर येथील शिवनेरी तालीमच्या मैदानात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्या हया यशाबद्दल प्रशस्तीपत्र व टा्फी देऊन गौरविण्यात आले.
त्याच्या हया यशाबद्दल विदयालयाचे मुख्याध्यापक कदम सर, क्रिडा शिक्षक नितीन करांडे,तानाजी जरे तसेच स्थानिक स्कूल कमीटी अध्यक्ष राजेंद्र सिह जहागिरदार यांच्या सह पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन विशालच्या हया यशाबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे. सध्या विशाल हा पिलीव येथील प्रशांत करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडयात सराव करीत आहे.







