गुलाबी थंडीमुळे चहाला मागणी वाढली –
जागतिक चहा दिनविशेष
सरपंच,उपसरपंच, आमदार खासदार ,साई अमृततुल्य, अमृततुल्य, चेअरमन,
त-हाडी प्रतिनिधी
चहाची तलफ आली की तो हवाच असतो चहा उत्सवर्धक आहे आणि चहाने काहीशी तरतरी येते आळस झटकला जातो,, झोप उडते, मनाला क्षणभर प्रसन्न वाटते आणि तृप्त झाल्यासारखं वाटतं म्हणून सकाळी झोपेतून उठल्यावर पाहिला चहा आणि नंतर इतर कामे हाती घेणारा मोठा वर्ग आहे वर्षभर चहा हवाच असतो पण हिवाळ्यात मात्र चहाची तलफ जास्त येते आणि दिवसातून अनेक वेळा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढते,
सद्या वातावरणात मोठा गारवा आहे आणि गुलाबी थंडी असल्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्यासोबत दिवसभर चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे दिवसभर चहाची टपरी, हॉटेल, कॉर्नर अशा ठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे इतर महिन्यांच्या तुलनेत चहाला मागणी वाढली असून 30 ते 40 टक्के चहा जास्त लागत आहे, चहाचे विविध ब्रँड बाजारात आले आहे, कोरा चहा, मलई चहा, बासुंदी चहा, गुलाबी चहा, लेमन चहा, ग्रीन चहा, गुळाचा चहा इराणी चहा, बदाम पिस्ता चहा , कॉफी, अशा विविध प्रकारच्या चहाची मागणी वाढत आहे चहासाठी लागणारे दुध, चहा पावडर, साखर यांची मागणी वाढली आहे
चहाच्या प्रत्येक टपरीवर, हॉटेलमध्ये वेगवेगळे दर आहे, तलफी ग्राहक किती रुपये खर्च झाले तरी चटकदार आणि तरतरीत चहाला पसंती देतात फेब्रुवारी महिन्यापर्यंत असेच वातावरण राहिल्यास यंदा चहा विक्रेत्यांना चांगले पैसे मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे
चौकट
नेहमी पेक्षा चहा पिणाऱ्यांची संख्या सद्या सर्वाधिक आहे जवळपास 30ते 40टक्के ग्राहक वाढले असून थंडी असल्यामुळे दिवसभर ग्राहकांची चहाला मागणी असते, थंडीत तरतरी आणि कडक चहाला मागणी जास्त आहे चहा शारीरिक दृष्टीने उत्सहावर्धक असल्यामुळे चहा पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
पिटु तावडे
सावित्री चहा त-हाडी
रिमझिम पावसात आणि गुलाबी थंडीत शरीराला उष्ण पदार्थ हवे असतात मन देखील अशा पदार्थ खाण्याकडे आकर्षित होते चहा कमी वेळात आणि जास्त कडक असल्यामुळे पिल्या नंतर शरीराला जाणवणारी थंडी काही वेळापुरती कमी होते त्यामुळे हिवाळ्यात चहाला मागणी जास्त असते
महेंद्र पारधी
हॉटेल चालक ममाणे
चौकट
चहा एक अमली पदार्थ आहे कोणताही अमली पदार्थ सेवन केल्यानंतर काही वेळ शरीराला तरतरी येते, उत्सवर्धक वाटते आळस नाहीसा होतो पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो म्हणून तलफ आली की चहा पिणे थंडी वाजते म्हणून दिवसभरात अनेक वेळा चहा पिणे शरीराला घातक आहे, दिवसभरात नेहमी प्रमाणे सकाळी आणि सायंकाळी एक कप चहा घ्यायला हवा
डॉ सचिन पाटील
त-हाडी
चहाचे दर हाप फुल
साधा चहा १० २०
लेमन चहा १० २०
बासुंदी चहा १५ ३०
स्पेशल चहा १२ २५
कॉफी १० २०
सरपंच, उपसरपंच , आमदार, खासदार, साई अमृततुल्य, नामदार, चेअरमन, या चहाना विशेष मागणी आहे







