विद्यादान करण्याचे काम बाजूला करीत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला ?
शाळेत शिकवायचे की आधार नोंदणी करायची ?
त-हाडी / प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागामध्ये विकास साधायचा झाल्यास शिक्षण हेच एक उत्तम माध्यम आहे. परंतु, सध्या तालुक्यातील शिक्षकांवर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सारखी अनेक कामे एक जानेवारीपासून लादल्याने शाळेत शिकवायचे की आधार नोंदणी करायची? असा सवाल शिक्षकांना पडला आहे. शिवाय विद्यादान करण्याचे काम बाजूला सारून आधार नोदणी चे काम करण्याची वेळ आली असल्याने शिक्षकांवरील कामाचा ताण देखील वाढला आहे.
सरकारी अनुदानित शाळांमधील संच मान्यता करण्यासाठी बंधनकारक असलेली विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची नोंदणी शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आधार नोंदणीच्या वेळी झालेल्या चुकांमुळे आता विद्यार्थ्यांच्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकल्याने महा-ई-
सेवा केंद्रांवर शिक्षकांना सातत्याने जावे लागत आहे. त्यामुळे शाळेत शिकवायचे की, आधार नोंदणी करायची, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारकडून शैक्षणिक वर्ष २०२२ – २३साठी केली जाणारी संच मान्यता आधार नोंदणीच्या आधारे होणार आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यानी आधार कार्ड काढलेले नाही. ज्यांनी काढलेले आहे. त्यातील बहुतांश विद्यार्थ्याच्या कार्डामध्ये द्यावा लागतो.
नाव, जन्म तारीख, पत्ता अशा चुका आहेत. मुळात ही जबाबदारी पालकांची असताना शाळांवर त्यांचा भार का असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. काही शिक्षकांच्या मते, महा-ई-सेवा केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी संपूर्ण दिवस लागत आसते हे विशेष
चौखट
तालुक्यात अनेक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढताना, आधार सेंटरमधून देण्यात आलेल्या पावत्या तांत्रिक कारण देऊन आधारकार्डमध्ये दुरुस्ती झाली नाही. अशी कारणे अनेकवेळा सांगण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अनेकवेळा हेलपाटे मारून आधारकार्ड अपडेट झाले नाहीत. येथील पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने अनेक शिक्षकांना आपल्या पदरचे पैसे भरावे लागत आहेत. एकतर अगोदरच तालुक्यात शिक्षक संख्या कमी असताना, त्यातच ही शाळाबाह्य कामे यामुळे शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी तारेवरची कसरत करावी लागते.







