विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळा कडे लक्ष केंद्रित करावे- मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी
दोंडाईचा येथे आश्रमशाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन…
दोंडाईचा- (श. प्र.) जनजागृत शिक्षण प्रसारक संस्था दोंडाईचा संचलित वि जा भ ज प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले क्रीडा महोत्सवाचे उदघाटन दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थचे चेअरमन भाऊसाहेब हितेंद्र महाले होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, दोंडाईचा बीट शिक्षण विस्तार अधिकारी दिपक सोनवणे, नगरसेविका भावना महाले, सामाजिक कार्यकर्ता निलेश महाले, संचालक हेमंत महाले, नंदा महाले मॅडम, आप्पासाहेब लांबोळे सर, प्रशांत अहिरे, मुख्याध्यापक पंढरीनाथ बागल, नरेंद्र बोरसे, प्रकाश जाधव माजी मुख्याध्यापक अरूण पाटील, प्रा.लक्ष्मण मोरे मान्यवर उपस्थित होते
देवेंद्र परदेशी, विक्रम पाटील, हितेंद्र महाले यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्रीडा स्पर्धचे महत्त्व पटवून सांगितले.
क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, लांबउडी, 100 मी धावणे, हॉलीबॉल, क्रिकेट, लिंबू चमचा, तीनपायी, गोणपाट, संगित खुर्ची इ. खेळांचा समावेश करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ कुलकर्णी तर आभार प्रदर्शन जितेंद्र गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले…







