दोंडाईचा येथे हुतात्मा विरभाई कोतवाल यांची 80 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी….
दोंडाईचा – (श. प्र.) येथील नाभिक समाजाच्या वतीने आज दि. २ रोजी हुतात्मा विरभाई कोतवाल यांची ८० व्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील हुडको कॉलनी येथील वास्तव्यास असलेले धनराज वारूळे यांच्या राहत्या घरी उत्साहात साजरा करण्यात आली. नाभिक समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा वत्सलाबाई चित्ते ह्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा लाभले होते. प्रतिमा पुजन शहराध्यक्ष छोटू महाले, धनराज वारूळे, मनिषा वारूळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी, दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रविंद्र चित्ते, शहराध्यक्ष छोटू महाले, युवक मंडळाचे शहराध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार संघाचे शहराध्यक्ष किरण सुर्यवंशी, नाभिक महिला मंडळाच्या शहराध्यक्षा वत्सलाबाई चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, दिलीप सैंदाणे, कैलास सैंदाणे, छोटू चित्ते, अनिल ईशी, सुनिल सैंदणे, राजेंद्र मोरे, भरत वरसाळे, महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, बन्सीलाल चित्ते, कैलास चित्ते, गोपाल बोरसे, लोटन पवार, श्रावण भदाणे, मच्छिंद्र पवार, भोला सैंदाणे, भरत सैंदाणे, भोला चित्ते, मधुकर चित्ते, विशाल महाले, जगदीश वरसाळे, भरत जयपाल, अशोक सोनवणे, बालू मोरे, बन्सीलाल मोरे, दिनेश बोरसे, राजेश मिस्तरी, मुकेश चित्ते, गुलाब पवार, अनिल चित्ते, अजय पवार, पिंटू सुर्यवंशी सोनू पवार यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रम वेळेपर्यंत शहरातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सलून दुकाने सुरू करण्यात आल्या….







