धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार == श्रीमंत युवराज संभाजी राजे
धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी जी जी मदत लागेल ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले कराड नांदगाव येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत अमरजीत राजे जहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार व बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजीराव वाटेगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
वंचितांना सामाजिक राजकीय आर्थिक व सर्व क्षेत्रात आणून त्यांना सर्वोत्तम मदत करणार .धनगर समाज हा प्रामाणिक असून त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन राजकीय नेते मंडळींनी त्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचे काम केले म्हणून धनगर समाजाने एकसंघ होऊन व संघटित होऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय गट तट बाजूला ठेवून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची प्रलंबित आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या लढ्याला माझा सर्वतोपरी सहकार्य राहील आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही अडचणी असतील ते अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर एक अभ्यास कमिटी नेमून त्याच्यावर सखोल अभ्यास करून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार .
आज ही धनगर समाज मूलभूत गरजांच्या पासून वंचित राहिला आहे त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते वीज शाळा आरोग्य या सुविधाडोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर समाजा बांधवांच्या पर्यंत पोहोचल्या नाहीत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा कालखंड गेला तरी सुद्धा या महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित घटक विकासापासून वंचित राहिला यांना मुख्य प्रवास आणण्यासाठी स्वराज संघटना निर्माण केली आणि पुन्हा एकदा नव्याने स्वराज्य निर्माण करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार .श्री प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठे योगदान असून आपली नोकरी सांभाळून समाजात ग्राउंड लेव्हल ला जाऊन डोंगरदऱ्याखोऱ्यातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद असून कोरोनाच्या काळातील अलौकिक असं काम केले आणि म्हणूनच आम्ही स्थापन केलेल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये आदराचे स्थान म्हणून त्यांना आमच्या स्वराज्य संघटनेमध्ये राज्याच्या कार्यकारणी मध्ये समावेश करत आहे







