नातेपुते येथे युवासेना अकलूज शहराच्या वतीने पत्रकारांचा सन्मान !
६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवासेना अकलूज शहराच्या वतीने शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व समाजसेवक अमित प्रभा वसंत यांच्या हस्ते नातेपुते येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला त्यावेळी प्रामुख्याने श्रीकांत बाविसकर,प्रमोद शिंदे साहेब (महाराष्ट्र न्यूज),विलास भोसले(दै तरुण भारत),अभिमन्यू आठवले(बहुजन भूषण),या सर्व पत्रकार बांधवांचे पेन,लेटरपॅड, वांझवाडा ग्रंथ देऊन सन्मान केले त्यावेळी वैभव आठवले,पपू मिसाळ,प्रीतम साळवे, इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार पत्रकार भोसले यांनी मानले.







