• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वेदत्री वेंचर एलएलपी कंपनी नातेपुते मधील गुंतवणूकदारांच्या फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक

माणगंगा by माणगंगा
January 12, 2023
in महाराष्ट्र
0
वेदत्री वेंचर एलएलपी कंपनी नातेपुते मधील गुंतवणूकदारांच्या फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक

वेदत्री वेंचर एलएलपी कंपनी नातेपुते मधील गुंतवणूकदारांच्या फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपींना अटक

नातेपुते (प्रतिनिधी ):नातेपुते पोलीस ठाणे येथील गु.र.नं.३८७/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ४०९, ४२०. सह एम. पी. आय. डी. कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील वेदत्री व्हेंचर एलएलपी नातेपुते या कंपनीने गुंतवणुकदारांना आकर्षीत करून गुंतवणुकदारांची विश्वासाने मोठया प्रमाणात गुंतवणुक केलेल्या रकमेचा परतावा देतो.असे सांगुन फिर्यादी तसेच फिर्यादी प्रमाणे इतर साक्षीदारांचे नोटरी करारा प्रमाणे ठेवींची गुंतवणुक रक्कमेची परतफेड केली नाही.

त्यावरील दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच नोटरी करारा प्रमाणे काही परतावा, लाभांश देवून उर्वरित परतावा, लाभांश व गुंतवणुक केलेली ठेवीची रक्कम न देता फिर्यादी व साक्षीदार यांची एकुण ८६,७०,७९८/ रुपयाची कपटपूर्ण रितीने फसवणुक केली आहे. म्हणुन वेदत्री वेंचर कंपनीचे मालक १) संतोष दत्तु गुरव, रा. कोथळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा. कोथळे, ता. माळशिरस, ३) सचिन गेनु फुले, रा. मोरोची, ता. माळशिरस यांचे विरुद्ध वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान यातील आरोपी १) संतोष दत्तु गुरव, रा. कोवळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा. कोथळे, ता. माळशिरस यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी दिनांक ०२/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना मा न्यायाधीश अति जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस यांचे समक्ष हजर केले असता, त्यांना दिनांक ०७/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.


चौकट :-


सोलापुर जिल्हा व इतर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकानी वेदत्री व्हेंचर एलएलपी नातेपुते कंपनीमध्ये गुंतवणुक केली असेल व ज्यांची फसवणुक झालेली असेल अशा
गुंतवणुकदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलुज येथे संपर्क साधावा. तसेच या प्रकारच्या
आकर्षक लाभ देणाऱ्या स्किमपासून लोकांनी सावध रहावे, कमी वेळेत जास्त नफा असल्या भुलथापांना बळी पडू
नये. असा कोणताही प्रकार चालु असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा.
डॉ. बसवराज शिवपुजे.
उपविभागीय पोलीस अधिकारी.
अकलूज.

________________________________

सदरची कारवाई मा. शिरीष सरदेशपांडे सो. पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. श्री हिंमत जाधय , अपर पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व श्री डॉ. बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग अकलूज यांचे नेतृत्वाखाली तपास पथकातील स. पो. नि. श्री सपांगे नातेपुते पोलीस ठाणे, पोहेकॉ समाधान देशमुख, पोहेका गणेश निंबाळकर, पोहेकॉ विकी घाडगे, पोना दत्ता खरात, पोना सचिन भोसले, पोकों/अजित कडाळे, पोकों अन्दर आतार सायबर शाखा यांनी कामगिरी बजावली आहे.

Views: 148
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून शिक्षकांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावे – राजगोपाल भंडारी यांचे आवाहन,

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून शिक्षकांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावे - राजगोपाल भंडारी यांचे आवाहन,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)