विकास इंग्लिश मिडीयम स्कुल वडाळी येथे सांस्कृतिक मोहोत्सव उत्साहात संपन्न
( प्रतिनिधी) दैनंदिन अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव ही पर्वणी असते विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यानुसार यात सहभागी होऊन सुप्त गुणांना संधी द्यावी यातून भविष्यात कलाकारही घडतात असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील यांनी केले
शहादा तालुक्यातील वडाळी येथे शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाळी तर्फे विकास पर्व सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक दत्तू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील विकास इंग्लिश मिडीयम च्या समन्वयिका प्रितीताई पाटील वडाळी सरपंच जयाबाई ठाकरे खैरवे -भडगाव सरपंच तेजस्विनी गिरासे, संस्थेचे संचालक गजेंद्रगिरी गोसावी विठ्ठल पाटील, गटशिक्षणाधिकारी डी.टी वळवी, शिक्षण विस्ताराधिकारी पी.बी.माळी जी. एस. विद्यामंदिर मुख्याध्यापक ए.एन.पाटील केंद्रप्रमुख आर.बी.माळी पर्यवेक्षक पी.डी.पाटील माजी पं.स.सदस्य भगवान पाटील माजी सरपंच दीपक पाटील फेसचे उपसरपंच राकेश पाटील माजी उपसरपंच हिम्मत सोनवणे भडगाव पोलीस पाटील धनराज पानपाटील बी.आर.सी चे हेमंत पाटील ग्रा.पं.सदस्य कल्पना मोहिते विनोद वळवी,निर्मला माळी यावेळी समन्वयिका प्रीती पाटील म्हणाल्या आजच्या स्पर्धेत च्या युगात विद्यार्थ्यांना निरंतर अभ्यास आणि परीक्षांच्या ताणतणावात व्यस्त असतो अशावेळी त्यांना मुक्त शालेय जीवन मिळवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री गिरासे यांनी तर सूत्रसंचालन इंग्लिश मिडीयम प्रशासक चंद्रकांत रायसिंग यांनी केले कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्या प्रियंका पाटील, अश्विनी सुर्वे, सपना पाटील,चैताली पाटील, धनराज पाटील, निशिगंधा पाटील, ऋतिका गिरासे,हर्षदा पाटील, प्रियेशा पाटील,राजेश गोसावी आदींनी परिश्रम घेतले







