जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जळोद प्रजासत्ताक दिन साजरा
त-हाडी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद ता.शिरपूर जि.धुळे येथे २६जानेवारी २०२३रोजी भारतीय “प्रजासत्ताक” दिनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप आधार पाटील यांची उपस्थिती लाभली अतिथींच्या हस्ते भारतमातेच्या पुजन, ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख अतिथी सह शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देण्यात आली. लिंबू चमचा,संगीत खुर्ची, फुगा फुगविणे असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले .
संस्थांतर्गत दिव्यांश क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव राबवण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्रथम क्रमांक आलेल्या टीमला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यासाठी शालेय प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.







