भोरखेडा पटेल विद्यालयात 13 वा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चित्रकला,निबंध स्पर्धा,व जनजागृती रॅली
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे 13 वा राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने मतदार जागृतीपर चित्रकला,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,
मतदार प्रतिज्ञा रुतीका राजपूत या विद्यार्थिनीने दिली यावेळी चित्रकला पोस्टर दालनाच्या उद्घाटन शिरपूर तहसील कार्यालयाचे निवडणूक कक्ष नायब तहसिलदार आर पी कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले या चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटात 73 व उच्च माध्यमिक गटात 20 तर निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात 30 तर उच्च माध्यमिक गटात 23 विद्यार्थी सहभागी झाले. यात चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शिरसाठ दिव्या देविदास इ 9 वी, द्वितीय क्रमांक महाजन योगेश्वरी युवराज इ 8 वी, तृतीय क्रमांक जाधव नंदिनी कमलसिंग,उच्च माध्यमिक गट प्रथम क्रमांक राठोड रंजना शंकर इ 11वी,द्वितीय क्रमांक बंजारा कंचन सजन इ 11 वी,तृतीय क्रमांक जाधव पूजा शंकरसिंग इ 11 वी तर निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पाटील चैताली बाळासाहेब इ 8 वी, द्वितीय क्रमांक गुजर वैष्णवी बाळू इ 9 वी, तृतीय क्रमांक घिसाळे ध्रुव विनोद इ 10 वी,उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पाटील नितु गणेश इ11वी,द्वितीय क्रमांक बंजारा रेखा भाईदास इ 12 वी तृतीय क्रमांक जाधव पुजा शंकरसिंग इ 11 वी यांनी मिळवला यांना शिरपूर तहसीलदार कार्यालय निवडणूक विभाग कडून प्रमाणपत्र देण्यात आले निबंध स्पर्धेचे परीक्षक आर जी पाटील, किरण कोळी तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षक दिपाली निकम,मिना पटेल,व्ही एस इशी हे होते भोरखेडा गावात मतदार जनजागृती रॅलीला नायब तहसिलदार कुमावत आर पी ,निवडणूक कक्ष मुख्य लिपिक प्रदीप परदेशी,प्राचार्य आर एफ शिरसाठ यांनी हिरवा झेंडा दाखविला







