• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गोडसेवस्ती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
January 28, 2023
in महाराष्ट्र
0
गोडसेवस्ती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोडसेवस्ती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा


विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्ती येथे 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिंदे सर उपशिक्षिका सोनार मॅडम यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ध्वजारोहण सकाळी उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन मुंजे आणि शिंगोर्णी ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री रघुनाथ गोडसे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायत( साधी व साहित्य) सादर केली.


उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य,पालक,ग्रामस्थ आणि शाळेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका आशा मॅडम व इतर सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार केला. नंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालक ग्रामस्थ यांच्यावतीने शाळेचे
मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिवाजी शिंदे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना फेटा बांधून, श्रीफळ,हार,पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान करण्यात आला.


इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर केली. पालकांच्या मनोगतनंतर क्रीडा स्पर्धा सन 2022-23 केंद्र स्तर क्रीडा स्पर्धेत कबड्डी मुले प्रथम क्रमांक ( विजेता ) बीट स्तर मुले कबड्डी( उपविजेता ) आणि केंद्र स्तर कबड्डी मुली प्रथम क्रमांक( विजेता) केंद्र स्तर खो खो मुली द्वितीय (उपविजेता )क्रमांक असे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांनी टॅलेंट हंट स्पर्धा 2023 या स्पर्धेत कथाकथन या स्पर्धेत अक्षय सोमनाथ मुंजे केंद्रात उत्तेजनार्थ तसेच गीत गायन स्पर्धेत केंद्रात तृतीय क्रमांक यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 200 पानी वही एक पेन तसेच प्रमाणपत्र दिले. ( 1600 रुपये खर्च केले )


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्तीच्या सर्व विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम केला. कोळीगीत, शेतकरी गीत, बालगीते, स्फूर्ती गीते, देशभक्तीपर गीत अशी विविध मनोरंजक गीते व नृत्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनार मॅडम व श्री सर्जेराव शिंदे सर यांनी केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्ती शाळेची प्रगती, गुणवत्ता, क्रीडा स्पर्धेतील यश व टॅलेंट हंट स्पर्धेतील यश पाहून उपस्थित मान्यवर श्री कलाप्पा मुंजे, श्री सचिन मुंजे, श्री सत्यवान पिसे, श्री विशाल धांडोरे, श्री विजय मुंजे, श्री नवनाथ गोडसे, श्री अर्जुन मुंजे, श्री प्रताप काळेल, श्री सर्जेराव शिंदे सर यांचेकडून सदर कार्यक्रमासाठी बक्षीस रुपये 2,400 मिळाले व शाळेच्या सोलर सिस्टम ची बॅटरी खराब झालेली आहे ती खरेदी करण्यासाठी व स्नेहसंमेलनासाठी उपस्थित मान्यवरांनी एकूण रुपये 20,111 रुपये. लोकसहभाग देणगी रूपाने देण्याचे जाहीर केले. खालील प्रमाणे
श्री सचिन मच्छिंद्र मुंजे -4000 रुपये.श्री आबासो महादेव मुंजे -3000 रुपये .श्री कलाप्पा दशरथ मुंजे-1111रुपये.श्री सत्यवान आण्‍णासो पिसे – 2000रुपये.श्री प्रताप कालिदास काळेल-2000 रुपये.श्री नवनाथ गुलाब गोडसे-1000 रुपये.श्री संतोष मधुकर गोडसे -1000 रुपये.श्री बाजीराव बापू शिंदे -1000 रुपये.श्री विशाल रामकृष्ण धांडोरे -1000 रुपये.श्री दीपक जयराम गोडसे -1000 रुपये.श्री अर्जुन धनाजी मुंजे -1000 रुपये.श्री आगतराव भिमराव काळेल-1000 रुपये.श्री रघुनाथ संदिपान गोडसे-1000 रुपये.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच सर्व बक्षीस देणाऱ्या मान्यवरांचे आणि सर्व देणगी देणाऱ्या मान्यवरांचे व विद्यार्थ्यांसाठी खाऊ देणाऱ्या पालकांचे व ग्रामस्थांचे तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व उपस्थितांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव शिंदे सर यांनी आभार मानले आणि खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 229
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)