रोजगार हमी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचारी गेल्या दहा ते बारा वर्षापासून अखंडित कामे करिता आहेत
वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार केली आहेत कोवी 19 च्या महामारीच्या काळातही शासनाकडून कोणतीही सुविधा नसताना रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील प्रत्यक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगार दिला आहे.असे असतांना तीन चार वर्षापासून आम्हा कंत्राटी कर्मचारी यांना कोणतेही मानधन वाढविण्यात आलेले नाही.
म्हणून कंत्राटी कामगारांना आकृती बंध मध्ये समायोजन करण्यात यावे,पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे,कंत्राटी कर्मचार्यांना राज्य निधी असोशियन मध्ये नियुक्ती देण्यात यावी ग्राम्रोज्गर सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या मध्यप्रदेश शासना प्रमाणे ६२ वर्षे वयापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी या मागणी करिता रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून तसे निवेदन शिरपूर तहसीलदार आबा महाजन तसेच गटविकास अधिकारी श्री.संजय सोनवणे यांना संघटनेतर्फे एपीओ एम एस देवरे,एपीओ महेंद्र धनगर, CDEO व्ही एच थोरात,एस.पी.मोरे,आय.उ.पावरा,तांत्रिक अधिकारी ,प्रफुल पाटील,एम आर पवार,एस आर पवार,ए.पी.पाटील,ए.एस.पाटील ,शशिकांत बेलदार यांनी आपल्या निवेदनातून दिलेलं आहे.
फोटो-शिरपूर – मनरेगा कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनाचे निवेदन गटविकास अधिकारी श्री.संजय सोनवणे यांना देतांना संघटनेतर्फे एपीओ एम एस देवरे,एपीओ महेंद्र धनगर, CDEO व्ही एच थोरात,एस.पी.मोरे,आय.उ.पावरा,तांत्रिक अधिकारी ,प्रफुल पाटील,एम आर पवार,एस आर पवार,ए.पी.पाटील,ए.एस.पाटील







