बीड पाटोदा मध्ये मिरवणूक ने शिक्षकाचा सेवा निवृत्ती चा,सन्मान !
पाटोदा- नफरवाडी ता.पाटोदा येथील भूमीपुत्र मा. श्री संजय सावंत सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम सेवानिवृत्त होऊन गावी आल्यावर वेशीतच गावकऱ्यांनी भव्य पुष्पहार घालून स्वागत केले वाजंत्री लावून आय एस ओ मानांकन मिळवलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचे लेझीम पथक यांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली. सरांनी ग्रामदेवतांच्या मंदिरात जाऊन श्रीफळ अर्पण केले.
गावातील महिलांनी दारोदार रांगोळ्या काढल्या होत्या तसेच आरत्यांचे ताटे घेऊन ओवाळून त्यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेऊन त्यांचे औक्षण केले.ही मिरवणूक हनुमान मंदिरा जवळ ग्रामपंचायत कार्यालया समोर भव्यदिवे स्टेज दिलेले होते तेथे आली. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी बाळूमामाचं चांगभलं गाथा नवनाथाची या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्री स्वप्ना दुर्वे , सौ.शुभांगी शिंदे एकपात्री प्रयोग फेम फलटण, माननीय श्री रघुनाथ ढोक ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य, माननीय श्री सिद्धार्थ कुलकर्णी अध्यक्ष विदर्भ साहित्य परिषद ,चित्रपट निर्मिती महामंडळाचे पत्रकार माननीय श्री राहुलजी खरात पुणे, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी संघटना मराठवाडा विभागाचे संघटक माननीय श्री सय्यद कोहिनूर सर तसेच शॉर्ट फिल्म अभिनेता संतोषजी गोरे यांना निमंत्रित केले होते. तसेच पाटोदा तालुक्यातील राजकीय मंडळी या कार्यक्रमात सरांचा सत्कार करण्यासाठी आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात हनुमानाच्या मूर्ती पुष्पहार घालून श्रीफळ फोडून करण्यात आली याप्रसंगी प्राथमिक शाळा नफरवाडी येथील विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शांताराम ढेरे सर यांनी केले नंतर आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे स्वागत आणि मुख्याध्यापक संजय सावंत सर यांचा नागरी सत्कार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा तरुण वर्ग यांनी केला. व्यासपीठावर सरपंच बंडू सवासे उपसरपंच बंटी तांबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुधीर घुमरे युवा नेते शाम होले समाजसेवक सुरेंद्र बाबा तिकडे पारगावचे सरपंच श्री पद्माकर घुमरे श्री बबलू घुमरे मा. राजेंद्र घुमरे सर प्रा. रावसाहेब भोसले युवा नेते प्रसाद घुमरे इंजिनीयर सुधीर सोनवणे श्री बाप्पा हुले श्री शहाजी जाधव पाळवदे सर सोनवणे सर श्री सोनवणे सर माजी सरपंच भीमराव तांबे उपसरपंच सुभाष सवासे आत्माराम सवासे आबाराजे चव्हाण राष्ट्रवादी पक्षाची युवा नेते प्रशांत सवासे भारत सवासे बालासाहेब सवासे वसंत चव्हाण अशोक सवासे श्री प्रभाकर मंडलिक फौजी श्री शिवाजी सवासे पोपट मंडलिक ज्ञानदेव तांबे श्री विजय जाधव पत्रकार श्री पोपट कोल्हे पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बीड हून आलेले अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि कार्यकर्ते केदारनाथ चव्हाण हरिभाऊ भराडी रंगनाथ पैठणकर दत्ता शिराळकर भैरवनाथ शिंदे इंजिनिअर चव्हाण साहेब प्रा. बालकनाथ यादव सर सरांचे भाचे राजू हराळे युवराज गायकवाड गणेश शिंदे मातोश्री बबई सावंत बंधू बाळासाहेब सावंत एसएससी बोर्ड पुणे नंदकिशोर शेळके तसेच सरांचे मित्रमंडळी आजी-माजी विद्यार्थी गावातील माता भगिनी पारगाव घुमरा अनपटवाडी येवलवाडी ढाळेवाडी व पाटोदा येथून सरांबद्दल प्रेम असणारी सर्व मंडळी या कार्यक्रमास आली होती सरांच्या बद्दलच्या आठवणी त्यांचे आजी-माजी विद्यार्थी तसेच शिक्षक मित्रमंडळी यांनी आपल्या मनोगतात सांगितल्या. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री सुधीर घुमरे श्री नजान सर यांनी सरांविषयी आठवणी सांगितल्या व सरांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांनी शिक्षकांचे किती योगदान असते हे सांगून शिक्षकांमुळेच मी अभिनेत्री झाले हे सांगून गाथा नवनाथाची मालिकेत काम करणारा नाथपंथी समाज कसा आहे यांना भेटण्यासाठी कोणतेच मानधन न घेता या कार्यक्रमाला मी आली आहे हे सांगितले तर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या शुभांगी शिंदे यांनीही विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान या विषयावर एक पात्री करून रसिकांची मने जिंकली मा. सिद्धार्थ कुलकर्णी मा रघुनाथ ढोक मानन राहुल खरात आणि मराठवाडा संघटक कोहिनूर सय्यद सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सावंत सरांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मा.श्री संजय सावंत सर यांनी आपण केलेल्या कार्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय काय केले ?हे गावकऱ्यांना सांगितले तसेच काही विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर सैनिक पोलीस वगैरे कसे बनले त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले हे सांगितले व विद्यार्थी घडल्यामुळे आत्मिक समाधान होत आहे हे सांगून विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे म्हटले आणि नफरवाडी ग्रामस्थांनी माझे वडील मी दहावीला असताना वारल्या मुळे पुढील शिक्षण गावकऱ्यांनी वर्गणी करून माझे केले याला मी उतराई कसा होऊ असे म्हटले ? गावकऱ्यांचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही हे सांगितले .
या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक माता भगिनी बाहेर गावाहूनआलेले सर्वजण जवळजवळ सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत कार्यक्रमास उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक खंडागळे सर यांनी आपल्या काव्यमय शैलीत केले तर आभार प्रदर्शन श्री शांताराम ढेरे सर यांनी केले आणि अल्पोपहारनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी उपस्थिती मान्यवर,
सरपंच नफरवाडी बंडू सवासे, उपसरपंच केशव तांबे, सर्व ग्रा.प.सदस्य,सुधीर घुमरे (जिल्हाउपाध्यक्ष भा.ज.प)
पद्माकर घुमरे (सरपंच पारगाव) बाबा तिपटे,सय्यद सर, घुमरे सर,नजान सर, सोनवणे सर,पाळवदे सर,बबलू घुमरे,ढेरे सर,प्रा.रावसाहेब भोसले सर, के.सी.चव्हाण सर,पत्रकार विजय जाधव, शहाजी जाधव, हुले,बप्पा हुले,प्रसाद घुमरे, इंजिनिअर सुधीर सोनवणे,चव्हाण सर ,बाळासाहेब सावंत सर







