अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी
मोलगी । प्रतिनिधी (श्री.रविंद्र वळवी)
नंदुरबार व धुळे जिल्ह्मातील निवृत्त अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना उपदान अर्थात ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहे. अंगणवाडी सेवेतूत निवृत्त होणा-या अंगणवाडी सेविका आणि मदनिसांना उपादानाची रक्कम मिळावी यासाठी विमलबाई पाटील यांनी कामगार न्यायालयात अॅड सुभाष पाटील यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.निवृन्त अंगणवाडी सेविका व मदतनिसांना निवृन्तीच्या दिवसापासून दरसाल दर शेकडा १० टक्के व्याजाने त्यांच्या शेवटच्या मानधनावर झालेल्या सेवाकाळानुसार उपदानाची रक्कम ४ आठवड्यात द्यावी,असे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे अंगणवाडी सेविकांना निवृत्त झाल्यावर व्याजासह एक ते दीड लाख रुपये तसेच मदतनिसांना सुमारे एक लाख रुपये मिळतील, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे,रामकृष्णा पाटील, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे बबिता परमेश्वर दत्ता जगताप अॅड गजानन थळे सुमंत कदम एकनाथ ठोंबरे शुभांगी पालशेतकर यांच्यासह पदधिका-यांनी दिली.
“महाराष्ट्रातील पहिला न्यायालयीन निकाल अंगणवाडी सेविका -मदतीस यांच्या बाजूने झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच संघटनेचेही मोठ्या प्रमाणात राज्यभर कौतुक होत आहे.
-युवराज बैसाणे, कार्याध्यक्ष,म.रा. अंगणवाडी कर्मचारी संघटना






