अभाणपूर येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
तऱ्हाडी:- जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा अभानपूर येथील इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना शिरपूर येथील सुप्रभात बजाज चे डिलर सागर जैन यांनी आपल्या कंपनी तर्फे अभाणपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी व शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यात दप्तर .पेन.वही कंपासपेटी हे
साहित्य सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यामुळे दरोरोज शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत झाली पालकांनाही या उपक्रमाचे कौतुक केले आहे यावेळी पालक विद्यार्थी व मुख्याध्यापक सिमा पाटील व शिक्षक गोकुळ सांळुके यांनी आभार मानले







