तऱ्हाडी विद्यालयात शिवजयंती साजरी
तऱ्हाडी:-येथील आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे शिव जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद भाईदास सोनवणे व मल्हार सेना उपाध्यक्ष सुनील धनगर गट नेते तुळशीराम भामरे .पोलिस पाटील प्रतापसिंग गिरासे संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे. योगेश पाकळे. प्रमोद पाकळे. योगेश प्रताप धनगर. आबा करंके. भगवान पाटील मुख्याध्यापक एन एच कश्यप यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुजा करण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा. निबंध स्पर्धा. शिवगर्जना स्पर्धा. शिवाजी महाराजांच्या आधारावर गीत व शिवाजी महाराज यांची वेशभूषा व शिवाजी महाराज यांचे मावळे वेशभूषा करून गावात जाऊन ठिक ठिकाणी शिवगर्जना व नृत्य सादर केले असे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली
या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक रावसाहेब चव्हाण व भावेश पाटील प्रविण शिंदे संतोष आडगाये यांनी नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस चव्हाण यांनी केले यावेळी विद्यार्थ्यी व शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सहभाग नोंदविला







