खरसुंडीतील सागवान साठयातील दोषी अधिाऱ्यांवर ठोस कारवाही व्हावी.ग्रामस्थांची मागणी
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे वन विभागाने कारवाई करत सागवान लाकडाचा साठा जप्त केला होता. यामध्ये पंचनामा व प्रेस नोट व सपेद खडूने केलेले मार्किंग मध्ये आकडेवारीची हेराफेरी केली होती. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की खरसुंडी गावच्या हद्दीतील किरण सुखदेव पुजारी यांचे मालकीच्या जमिनीच्या गट क्रमांक 140 या खाजगी क्षेत्रात अज्ञात इसमाने विनापरवाना बिगर पासी, बिगर शिक्का, अवैधरित्या सागवान या मौल्यवान प्रजातीचे अनगड नग 66 घनमीटर 2.584 सरकारी माल किंमत 30 हजार 230 रुपये किमतीचा मालवाहतूक करून ठेवलेला आढळून आले असल्याची वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी माहिती दिली होती.
परंतु पंचनामा करीत असताना यामध्ये 48 नग व 32 नग असे 80 नग व जळावू नग असे एकूण 1 घनमीटर इतके नग पकडले असल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले आहे.
तर सागवन साठ्याचे एकूण नग 85 पकडल्याचे सपेद खडूने केलेल्या मार्किंग वरून दिसून येत आहे. तर पंचनामा करीत असताना खरसुंडीचे वनपाल पांडुरंग खूपसे ,वनरक्षक ज्योती घागरे व वनमजूर बी.एस .ऐवळे यांच्या सह्या आहेत.
वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी त्यांच्या सहिने 66 नग असलेचे नमूद केले आहे. परंतु पंचनामा व प्रेस नोट व सपेद खडुच्या मार्किंग मध्ये बदल बदल कसा काय झाला.
चौकट
खडूनी केलेले मार्किंग पंचनामा मधील आकडेवारी व वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी दिलेली प्रेस नोट यामध्ये आकडेवारीची अदलाबदल केलेली आहे यावरून लाकूडतोड वाल्याशी सर्व
खरसुंडीतील वैद्य साठ्या चा पंचनामा वनपाल पांडूरंग खूपसे, वनरक्षक ज्योती घागरे व वनमजूर यांनी केला यामध्ये 80 नग एक घनमीटर इतका साठा पंचनाम्यामध्ये दाखवण्यात आला.
वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांनी 66 नग 2.584 घन मीटर 30.2030 रुपयाचा साठा जप्त केले असल्याची प्रेस नोट दिली.
प्रत्यक्ष लाकडाचा साठा जप्त केला त्यावेळेला सफेद खडूने प्रत्येक नगावर अंक टाकले होते. शेवटच्या नगावर 85 अंक असा टाकला होता.
खडूने टाकलेला शेवटचा नग 85 आहे, वन विभागाने प्रेस नोट दिलेल्या मध्ये 66 नग म्हटले आहे .तर पंचनाम्यामध्ये 80 नग म्हटले आहे.







