झरे महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन संपन्न
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे. या महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2022- 23 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर, विरळी ता. माण येथे दि. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत संपन्न होत आहे.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडला.या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून विरळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.निलम हणमंत घुटुकडे या उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, आर.एच.पाटील हे होते तसेच संस्थेचे संचालक, यू. सी. नलवडे व जानुबाई विद्यालय विरळीचे मुख्यध्यापक, के.के. माने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच नीलम घुटुकडे या म्हणाल्या की खऱ्या अर्थाने हे शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी, बंधूता निर्माण व्हावी.तसेच परिसर स्वच्छ करत असताना राष्ट्रीयत्वाची जाणीव अधिक निर्माण व्हावी हा महत्त्वाचा उद्देश असतो. तसेच जानुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. माने म्हणाले की आज मला माझ्या कॉलेजचे 30 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले विद्यार्थ्यांमध्ये एकात्म भाव निर्माण होऊन बंधुभाव वाढीस लागणेसाठी या शिबीराचा उपयोग होणार आहे.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर. एस. पाटील म्हणाले की महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे शिबिराचे आठवे वर्ष आहे ज्या गावांमध्ये आमचे शिबिर गेले त्या गावात आमच्या विद्यार्थ्यांनी केलेले काम पाहून आपले पुढच्या वर्षीही हे शिबिर आमच्याच गावात राबविण्यात यावे अशी लोकांची भावना असते.
या सगळ्या गोष्टींचा श्रेय हे विद्यार्थ्यांना जातं कारण आमचे विद्यार्थी कोणतेही काम करत असताना ते अतिशय प्रामाणिकपणे व शाश्वत असे करतात कारण आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले काम समाजाला चिरकाल उपयोगी पडेल असे असते. तशाच पद्धतीचे काम विरळी गावामध्येही आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी करतील आणि गावच्या कौतुकास पात्र ठरतील असा मला विश्वास वाटतो.
तसेच आपल्या प्रास्ताविकात प्राध्यापक एम.डी. खांडेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुरुवातीचा इतिहास व उद्देश मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा.डी.एस.देवकुळे यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक यू. सी. नलवडे. विरळी गावच्या लोकनियुक्त सरपंच नीलम घुटुकडे, उपसरपंच, आनंदा आटपाडकर,ग्रामपंचायत सदस्य मल्हारी भंडारे,अंजना सकट, शिवाजी गोरड, भारत नलवडे, दौलत गोरड,ग्रामसेवक, तानाजी गंबरे, प्रा. एन. डी. पाटील प्रा. एम .एस. शिंगाडे प्रा. व्ही. ए. खिलारी प्रा. सौ. रेश्मा काळेल प्रा.सौ. माया माने श्री.जे.जे. फकीर.तसेच गावचे ग्रामस्थ व एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.







