श्रीराम फायनान्स कंपनी कडून माळशिरस तालुक्यात कर्ज वसुलीचा धडाका सुरुच
पिलीव प्रतिनिधी/-विश्वजीत गोरड
श्रीराम फायनान्स कंपनी कडून कर्ज़दार श्री. दादासो शंकर शेंडगे रा. तामशिदवादी यांनी वाहन कर्ज घेतले होते. त्याची वेळेत न परतफेड केल्यामुळे कंपनीने कर्जदार विरुद्ध लवाद न्यायालयकडून रक्कम वसूल करण्याबाबत अवार्ड मंजूर करून घेतले होते.
तरीदेखिल कर्जदाराने श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज परत केले नाही म्हणून श्रीराम फायनान्स कंपनीने माळशिरस येथील सिविल जज सिनिअर डिव्हिजन या न्यायालयात लवाद दरखास्त नंबर 255/2021 ही दाखल केली होती त्यामध्ये सदर कर्जदार श्री दादासो शंकर शेंडगे यास नोटीस देखील पाठवले होते ती नोटीस मिळून देखील कर्जदार यांनी सदरील कंपनीचे कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ केली.
त्यामध्ये दादासो शंकर शेंडगे या कर्जदारास “अटक का करू नये” म्हणून पुन्हा एकदा न्यायालयाने एक संधी देऊन कर्ज परतफेड बाबत नोटीस दिली होती तरी देखील सदरील कर्जदार यांनी सदरील अर्जदार कंपनीचे कर्ज देण्यास टाळाटाळ केली. म्हणून कर्जदार कंपनीचे अँडव्होकेट श्री.स्वप्निल शिवानंद कोरे यांनी कर्जदार यांना अटक करून दिवाणी न्यायालयात पाठवण्याचा आदेश मिळवला त्यामध्ये कर्जदारास न्यायालयीन बेलीफ श्री तोळनुरे यांनी अटक कडून मे. न्यायालयात हजर केले.
त्यावेळी मे. न्यायाधीश जोशीसो यांच्या समोर कंपनी श्रीराम फायनान्स कंपनी यांचे अधिकारी यांनी स्वतःहुन कर्जदार यांची वसुलीची रक्कम कमी करण्यास तयारी दर्शवली, परंतु तडजोड रक्कम रुपये एक लाख तीस हजार आजच सदर कर्जदार हे भरणार असतील तर सदरील दरखास्त हे कंपनी काढून घेण्यास तयार आहेत असे दर्शवले. परंतु कर्जदार आहे आज रोजी 1,30,000/- रुपये पेक्षा कमी भरण्यास तयारी दर्शवली. त्यास मे.जोशीसो कोर्ट यांनी नकार देत सदरील कर्जदार यास पंधरा दिवसाच्या दिवाणी तुरुंगात पाठवण्याचा आदेश केला.
या महिन्यात कर्जदार कंपनी यांनी दुसऱ्यांदा कर्जदार यास दिवाणी करून जातात पाठवले आहे. मागील महिन्यात कंपनीने जामीनदार यास दिवाणी न्यायालयात पाठवले होते. त्यामुळे सदरील कर्जदार कंपनीने वसुलीचा धडाका माळशिरस तालुक्यात लावल्याचा दिसून येत आहे.







