टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
त-हाडी –
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे परिसरातील महिलांसाठी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती सदस्या उज्ज्वला पारधी,माजी ग्रामपंचायत सदस्या आशा भील उपस्थित होत्या.
सर्वप्रथम स्रियांना शिक्षणाची व्दारे खुली करून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यांतर शाळेतील इयत्ता २ रीतील पायल कोळी हिला आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून शाळेतर्फे तिला भेटवस्तू देण्यात आली.तसेच शाळेकडून माता पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते
माता पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व पालकांच्या वतीने अभिनंदन केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आर.बी.खोंडे यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी उपस्थितांना सांगून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केल्याची अनेक उदाहरणे दिली त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करा.मुले-मुली असा भेद टाळा मुलींना भरपूर शिकवा असे आवाहन करून शासनाने मुलींसाठी सुरू केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली.
व उपस्थितांचे आभार मानले.सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल, तसेच उपशिक्षिका बबिता काटोळे,जयश्री पाटील बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा, ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.
फोटो. – शिरपूर तालुक्यातील टेकवाडे आर सी पटेल प्राथमिक शाळेत ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले त्यावेळी मुख्याध्यापक आर बी खोंडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उज्ज्वला पारधी, माजी ग्रामपंचायत सदस्य आशा भिल, भारती शिरसाट, अरुणा शिरसाट, योगिता कोळी,. शिक्षक शिक्षिका उपस्थित होते







