अर्थे येथील शिक्षिका प्रतिभा बारी यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित….
तऱ्हाडी:-4 मार्च 2023 रोजी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमिताचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा अर्थे खुर्द तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील शिक्षिका प्रतिभा रमेश बारी यांना दिल्ली येथे Women of Substance या
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. महिला कोर्ट न्यायालय न्यायाधीश .ज्योती माहेश्वरी होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जव्हेरी लालजी, द्वारका न्यू दिल्ली . मदनलाल मीनाजी, ॲड.निघात अब्बासजी, लेखक .रेणू सेनजी, बीजेपी अध्यक्ष . नौक्षम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. निघत अब्बासजी, मा. CEO Hypedge media group गौरव गौतमजी,मा. DCP श्री मदनलाल मीनाजी यांच्या हस्ते श्रीमती प्रतिभा बारी यांना Women of Substance पुरस्कार Excellence in Education या कॅटेगिरीतून प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुरवाडकर शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी. बुवा , केंद्रप्रमुख.नंदकिशोर पाटील , केंद्र मुख्याध्यापक भटू शेवाळे , व शिक्षकवृंद राजेंद्र दाभाडे ,ललिता गिरासे म नीता पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







