• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कूलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या; दिनेश माळी यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
March 20, 2023
in महाराष्ट्र
0

कूलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या; दिनेश माळी यांचे आवाहन

त-हाडी – प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात तापमान वाढल्याने कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते. त्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे वरुळ येथील उपकार्यकारी अभियंता दिनेश माळी यांनी आवाहन केले आहे. कुलरसाठी नेहमी पिन प्लगचा वापर करावा. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही..

पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे. त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिगची तपासणी करून घ्यावी. अथिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी…

पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमी कुलर पासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.कुलरच्या लोखंडी बाह्याभागात वीजप्रवाह उतरु नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा.

यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे. कुलरबाबत माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे.

कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कुलर पंप अधूनमधून बंद करावा. दैनंदिन व्यापातून थोडासा वेळ या उपाययोजनांसाठी दिला तर कुलरमुळे होणारे विद्युत अपघात टळू शकतात.अशी माहिती दिनेश माळी उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय वरुळ यांनी बोलताना सांगितले.

Views: 126
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लाल मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार महागाईचा फटका – चटका

लाल मिरचीचा ठसका सर्वसामान्यांना बसणार महागाईचा फटका - चटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)