महामंडळाच्या एसटी तिकीट सवलती नंतरही “बोगस कार्ड” धारकांचा सुळसुळाट..!
वाहक-चालकांची वाढली डोके दुखी
त-हाडी =-राज्यशासणाने महामंडळाच्या एसटी बसेस.मध्ये प्रवाशां साठी तिकिट दरामध्ये दिवांग,जेष्ठ नागरीक,स्वातंत्र्य सैनिक,शासणाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती,जेष्ठ नागरिक तर आता महिलांना पन्नास टक्के एसटी तिकिट दरा मध्ये सवलत दिलेली आसतांनी अनेक पन्नाशीतील नागरिक आधार कार्ड वर बोगस जन्मतारीख दाखवीत तिकीट दरामध्ये सवलतीचा गैरफायदा घेत आसल्याने वाहक-चालकांची डोके दुखी वाढली आहे.
महामंडळाच्या प्रवाशी एसटी बसेस मध्ये एसटी च्या नानाविध सवलती आहेत.त्यामुळे अनेकांना प्रवासावर होणारा खर्च कपात झाला आहे.परंतु जेष्ठ नागरिक सुविधे साठी चाळीस ते पन्नास वयोगटातील अनेक नागरिक आधार कार्डच्या बोगस प्रतीवर आपले वय हे 1948 दरम्यान बनवित स्वतःचे वय पंचहात्तर वर्षाचे दाखवत आहेत.विशेष म्हणजे वाहकांना कोडे पडते की सदर समोरील व्यक्ती ही चाळीस ते पन्नास वयोगटातील आहेत.
याची खात्री झाल्या नंतर सुध्दा समोरील व्यक्ती आधार कार्डवरील वय बघा म्हणतो,यावर वाहकाने थोडी जरी शंका निर्माण केल्यास थेट प्रवाशांशी गैर वर्तुनिक केल्याचा आगडोंब केल्या जातो.आशा गंभीर प्रकाराने वाहक-चालक वैतागलेले दिसत आहेत.आशा बोगस प्रकारावर तात्काळ आळा घालने आवश्यक आहे.कारण जे नागरिक पुर्ण टिकिट काढतात त्यांना सुध्दा एसटी बसे मध्ये बसायला जागाच मिळत नाही.त्यामुळे महामंडळाच्या एसटी तील तिकिट सवलतीने लाभा ऐवजी नुकसानच होत आसल्याची चर्चा आहे.
कोण बनवतो डुप्लीकेट आधार कार्डची प्रत = महामंडळाच्या प्रवाशी एसटी बसेस मध्ये तिकिट दरात सवलत मिळविण्यासाठी मतदान कार्ड,आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
सवलतीचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्डची डुप्लीकेट प्रत ही एखाद्या एजेंटच्या माध्यमातून कुठल्याही झेराॅक्स केंद्रावर अवघ्या दोनशे रूपया मध्ये उपलब्ध होते.प्रवानी सरासरी प्रवासा साठी आधार,किंवा मतदान कार्डच्या डुप्लिकेट प्रतीचाच वापर करतात.कारण वाहकाने कार्ड जप्त जरी केले तरी ते डुप्लीकेट आसल्याने नो टेंशन असे प्रवेशीच बोलतांनी दिसतात.







