• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली ; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान

माणगंगा by माणगंगा
March 26, 2023
in महाराष्ट्र
0
रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली ; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान

रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली ; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान

त-हाडी- प्रतिनिधी : गुरूवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी कालगणनेतील रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा पहिला रोजा पार पडला. रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली आहे.

बाजारात मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० ते २,५०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी आहे. अजवा खजुराची किंमत सध्या १,००० ते १,५०० रुपये किलो आहे. तीदेखील १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे.

या शिवाय कलमी, ओमानी, मस्कती खजूर असे पर्याय उपलब्ध आहेत. खजुरांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर ६०० ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेला आहे. ७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साध्या खजुराची किंमत ही ९० रुपयांपेक्षा पुढे गेली आहे. विविध दुकानात खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

प्रत्येक मशिदीत तरावीहची नमाजचे आयोजन
गुरूवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर विशेष तरावीहची | नमाज प्रत्येक मशिदीमध्ये अदा करण्यास सुरुवात करण्यात आली. ती काही ठिकाणी दहा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवस रोज रात्री चालणार आहे. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी दहा दिवसांच्या तरावीह नमाजचे आयोजन करण्यात आले होते.

सलग चौथ्या वर्षी मार्च – एप्रिलमध्ये रोजे
पवित्र रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे यंदाचे चौथे वर्षे आहे.

या अगोदर सन २०२० मध्ये २५ एप्रिल, २०२१ ला १४ एप्रिल, तर २०२२ ला ३ एप्रिल रोजी रमजान पर्व सुरु झाले होते. यंदा २३ मार्चपासून रमजान सुरु झाले असले तरी चार आठवडे रमजान एप्रिल महिन्यात येत आहे. दरम्यान, आता बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

Views: 184
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महात्मा फुल्यांचे खरे वारसदार होण्यासाठी ही सत्यशोधक विवाह पद्धत शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज – शेफाली भुजबळफुले एज्युकेशन तर्फे शेफाली भुजबळ यांचे उपस्थितीत ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न.

महात्मा फुल्यांचे खरे वारसदार होण्यासाठी ही सत्यशोधक विवाह पद्धत शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज - शेफाली भुजबळ
फुले एज्युकेशन तर्फे शेफाली भुजबळ यांचे उपस्थितीत ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)