कांदा अनुदानासाठी पीक पेरा नोंद अट शिथिल करावी….
लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांची मागणी…..
त-हाडी :-कांद्या पिकाचे बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा पिक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. गावात शेतकऱ्यांनी कांदा, कापूस भाव पडल्याने शेतकऱ्यांनी आंदोलने केली. शासनाच्या कांदा पिकाच्या धोरणांविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला.शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक पहाता राज्य शासनाने १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या कांद्याला प्रति किलो ३५० रुपये अनुदान जाहीर केले.
अनुदानासाठी ई- पीक पाहणी पेरा अट घातली आहे. शासनाने जाहीर केलेले ई – पीक पहाणी नोंदणीचे अॅप चालत नाही. अनेक शेतकर्यांना मोबाईल वापरता येत नाही.शेतात रेंज राहत नाही या कारणांमुळे कांदा पिकाचा पेरा नोंदता आला नाही. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी संबंधित विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या.आहेत. यासाठी शेतकरी जबाबदार नाही.
कांदा ई पीक पेरावाचून कोणताही कांदा उत्पादक शेतकरी अनुदाना पासून वंचित राहणार नाही.याची दखल शासनाने घ्यावी. किंवा संबंधित तलाठी कार्यालयातून हस्तलिखित पीक पहाणी नोंद करण्यात यावी. अशी मागणी शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केले आहे







