ग्रामस्वच्छता अभियानात त-हाडी ग्रा.पं.ला वसंतराव नाईक तृतीय क्रमांक पुरस्कार जाहीर
त-हाडी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत येथील ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी) तृतीय क्रमांकाचा जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील ५६ जिल्हा परिषद गटातील ५४१ ग्रामपंचायतींनी ग्रामस्वच्छता अभियानाच्या या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गट तपासणी समिती स्थापन केली होती. या समितीच्या तपासणी अहवालानंतर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात त-हाडी ग्रामपंचायतीने वसंतराव नाईक तृतीय क्रमांकाचा पंचवीस हजार रुपयाचे पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे, ग्रा.पं. , सदस्य व ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे यांच्यासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे…………………………………
भविष्यात संत गाडगेबाबा
ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम गावात प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे. हा पुरस्कार ग्रामस्थांच्या सहभागातून व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे प्राप्त झाला आहे. यामुळे प्रेरणा निर्माण झाली आहे.
-जयश्री धनगर, सरपंच त-हाडी







