रणरणत्या ऊन्हात घणाचे घाव मारणार्या कोरड्या घशास थंड पाण्याच्या व्यवस्थेसाठी माठ भेट
थंड पाणी पिण्यास मिळावे म्हणून गरीबांना माठ वितरण
सामाजीक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांचा सेवाभावी ऊपक्रम
मंगरुळपीर:-रणरणत्या ऊन्हात ऐरणीवर घणाचे घाव घालुन लोहार बांधव विविध प्रकारे वस्तु बनवुन त्याव्दारे आपला आणी कुटुंबियांचा ऊदरनिर्वाह करीत असतांना घशास माञ कोरड असल्याने सामाजीक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांनी सेवाभावी जाणीवेतुन या कुटुंबियांना थंड पाणी पिण्यास मिळावे या ऊदात्त हेतुन मातीच्या माठाचे वितरण केले आहे.
सामाजिक ॠण फेडता यावे या विचारातुन नेहमी सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्या सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांनी तप्त ऊन्हात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गरीबांना व्हावी या मनोभावनेतुन मंगरुळपीर येथील पाल ठोकुन जे लोहार बांधव राहतात आणी जे ऊन्हातान्हातही मेहनतीचे काम करुन लोहारकाम करुन आपली गुजरान करतात.यामध्ये त्या कुटुंबियामधील महिला आणी लहान मुलंही मदत करतात.सध्या ऊन्हाचा पारा चढलेला आहे.या स्थीतीत वारंवार घशाला कोरड पडते आणी तहान लागते.या स्थीतीत अशा काबाडकष्ट करणार्या परिवाराला थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टीकोणातुन माठ ऊपलब्ध करुन आपल्या सेवाभावी कार्याचा परिचय दिला.
फुलचंद भगत यांनी याआधीही अनेक सेवाभावी आणी लोकोपयोगी ऊपक्रम राबवुन गरीबांना मदतीचे हाथ दिल्याने त्यांना पुरस्कारही मिळाले आहे.त्यांच्या या कार्यातुन अनेकांनी प्रेरणा घेवून त्यांनीही असे सामाजिक ऊपक्रम राबवन्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी केशव भगत,सोळंके आदींची ऊपस्थीती होती.सर्वांनी अशाच प्रकारे आपापल्या परिसरातील गरजुंची आपल्या सत्कार्याव्दारे सेवा करावी आणी गरीबांना नेहमी मदतीचा हाथ द्यावा असे आवाहनही यावेळी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले आहे.
फोटो रणरणत्या ऊन्हात काबाडकष्ट करणार्या लोहार कुटुंबियांना थंड पिण्यासाठी पाणी ऊपलब्ध व्हावे या हेतुने सामाजीक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांनी केले माठ वितरण







