*राजकारणातील तपस्वी हरपला:आ.गणपतराव देशमुख आबा यांचा म्रुत्यु क्लेशदायक!
आमदारांनो हा घ्या आदर्श ..!!
वेतनवाढ तर कोणीही घेईल ..!!
गणपतआबा देशमुख शेकापचे आमदार सांगोला विधानसभा मतदार संघ ..!! १२ वेळा सलग आमदार, वय वर्षे ९४, गिनीज बुक मध्ये सलग निवडून येण्याचा विश्वविक्रम ..!!
आजही अनवाणी, पायी फिरतात ..!!
घरात अठराविश्वे दारिद्र्य ..!!
पैशासाठी मोठ्या मुलाची आत्महत्या ..!!
सोलापूरला असताना वैयक्तिक कामाच्या निमित्तानं सांगोल्याला गेलो होतो. गणपतरावांच्या ऑफिसमध्ये साध्या लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. गावातले लोक त्यांना ‘आबा’ म्हणतात. आबा आणि आबांचं हे घर पूर्वीपासून असंच, साधं असल्याचं गावकरी सांगतात ..!!
या वयातही आबा सकाळी ७ वाजता कामाला सुरुवात करतात. रात्री उशिरापर्यंत ते सुरू असतं. सर्व अधिकारी त्यांना मानतात. त्यांनी सांगितलेलं काम झटपट करतात. सांगोल्यात तर सरकार दरबारी, लोकांची कामं कधीही अडवली जात नाहीत ..!!
डोंगराएवढं काम करून हा मनुष्य ‘हे मी केलं ..’ असं म्हणत नाही. सतत ‘आम्ही केलं’, ‘आमच्या पक्षानं केलं’ असं म्हणतो. सभा संपल्यानंतर त्यांच्यासोबत सूतगिरणीतल्या गेस्ट हाऊसवर गेलो. भव्य परिसर .. जवळ आलेल्या कर्मचार्याला त्यांनी सांगितलं, `हे शिक्षणसेवक आहेत. यांची इथं रहायची व्यवस्था करायची. चांगली रुम द्या. गेस्ट हाऊसमध्ये एव्हढया उशिरा जेवण शिल्लक नसणार. हे शंभर रुपये घ्या. जवळपासच्या हॉटेलवर यांना जेऊ घाला. या शंभर रुपयांत आताचं जेवण उद्याचा नाश्ता होईल. उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मी करीन ..!!’ ना गेस्ट हाऊसवर मटणाचा रतीब ना कार्यकर्त्यांसाठी ‘खास सोय ..!!’ फक्त आणि फक्त काम ..!!
१२ वेळा आमदार होऊन किमान ६ ते ७ वेळा आदर्श व उत्कृष्ठ संसदपटु ठरले ..!! सभागृहाचे प्रत्येक वेळेस तालीका अध्यक्ष झाले .. पण कधीही कुठल्या पुरस्काराची जाहीरात नाही, की दिखावा नाही ..!!
निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना दारु नाही की मटण नाही ..!! प्रत्येक कार्यकर्ता स्व-खर्चाने, प्रेमाने आबांसाठी खर्च करतो ..!!
राजकीय आकसाने कधीही कुठल्याही प्रकारचा निधी अडवला नाही, उलट आपली ताकद वापरुन तो अधिक कसा मिळेल आणि लवकर कसा येईल यासाठी धडपडतील ..!!
ऊभ्या केलेल्या संस्था नेहमी उत्कृष्ठच राहील्या पण संस्थेचा पैसा व कर्मचारी कधीही स्वत:साठी वापरला नाही .. ना आपल्या वाहनाचे भाडे, डिझेल, आपल्या ड्रायव्हरचे पगार घेतले ..!!
असे हे अलौकीक व्यक्तीमत्व ..!! आज त्यांचा वाढदिवस ..!! आमदार कसा असावा याचे उदाहरण ..!!
मला इतर सहकार सम्राटांचा बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता मात्र वेगळाच ..!! तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप त्यांच्यावर कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात गणपतरावांसारखा बिनडागाचा नेता, आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. त्याना पाहून मला तुकोबारायांचा अभंग आठवतोय ..
चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग ..
दीपा नाही पाठी, पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी ..!!
गणपतरावांबद्दल एक गोष्ट माहित आहे म्हणून सांगतो. हे गृहस्थ एखाद्या फुरसतीच्या दिवशी शासनाची आऊटडेटेड कागदपत्रांची रद्दी काढतात, विकून आलेले पैसे ट्रेझरीत भरुन शासनाला परत करतात. एक अनुकरणीय व्यक्तिमत्व ..!!
आदरणीय आमदार मा गणपतराव देशमुख साहेब आज आपल्यात राहिले नाहीत, महाराष्ट्र एका तपस्वी राजकारण्याला मुकला आहे!एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ पंचावन्न वर्षे या इतिहासाची आज अखेर झाली आहे. त्यांच्या पवित्र म्रुतात्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना
अमित पाटील मुंबई