अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड आणि नाथ मृदा बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने नाथ दिक्षाचा कार्यक्रम डॉ योगेश क्षीरसागर माजी आमदार मा. केशवराव आंधळे डॉक्टर के बी पैठणकर यांच्या उपस्थितीत साजरा .
बीड-अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथ मुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बीड कपिल मुनी मंदिर या ठिकाणी अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील व बीड जिल्ह्याच्या शेजारील परिसरातील नाथबांधवांचा नाथ दीक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे युवा नेतृत्व डॉक्टर योगेश भैय्या क्षीरसागर आणि चौसाळा मतदार संघाचे माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या उपस्थितीत पार पडला
याप्रसंगी सुरुवातीला गुरु गोरक्षनाथ यांचा प्रकट दिन असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेची पूजा माननीय प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली नंतर जवळजवळ 52 नाथ बालकांना नाथ दिक्षा देण्याचा कार्यक्रम गुरुवर्य यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर के बी पैठणकर यांची स्टीम यांनी इंजेक्शन औषध आणून नाथ दीक्षाला विज्ञानाची जोड दिली त्यामुळे नाथ दिक्षा घेणाऱ्याला कुठलाही त्रास झाला नाही
तसेच यानंतर मान्यवरांचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले याप्रसंगी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी नाथ बांधवांसाठी व समाजासाठी भविष्यात पाहिजे ती मदत करायला तयार आहे असे सांगितले तसेच गुरु गोरक्षनाथ बद्दलची माहिती दिली. तसेच केशवराव आंधळे साहेब यांनीही हा समाज दुर्भिक्षित झालेला असल्यामुळे समाजाला अनेक प्रश्नाला तोंड द्यावे लागते शिक्षणाचा अभाव भिक्षुकी यामुळे समाज मागे राहिला आहे यापुढे शिक्षण घेऊन स्वतःचा विकास करावा असेही त्यांनी सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर केबी पैठणकर यांनीही नाथपरंपरेची सखोल माहिती देऊन समाजातील नाथ बांधवांच्या मुलांनी भिक्षूकी कडे न वळता शिक्षण घेऊन विकास करावा व समाजाचाही विकास करावा असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते
अखिल भारतीय नाथपंथी समाज अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष मराठवाडा युवा अध्यक्ष औरंगाबाद हुन मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी धायडे साहेब तसेच मा. प्रकाश आहेरकर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली या कार्यक्रमात महासंघातील कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवला जिल्हाध्यक्ष भरत नाना चव्हाण यांनीही समाजासाठी महासंघ काय काय करत आहे हे प्रास्ताविकामध्ये सांगितले श्री हरिभाऊ भराडी, रंगनाथ पैठणकर,निकम, बामणे, पांचाळ, सावंत,शिराळकर, शिंदे, चव्हाण,जाधव, नागरगोजे,विरगट,कराळे, पवार वगैरे नाथ बांधवांनी खूप कष्ट घेतले. शेवटी माजी जिल्हा अध्यक्ष के.सी. चव्हाण सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले नंतर आरती होऊन महापंगत झाली व कार्यक्रमाचे सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिराळकर मॅडम आणि यादव मॅडम यांनी केले.







