जागतिक कुटुंब दिवस; कौटुंबिक सलोखा जपणारा त-हाडीतील परदेशी परिवार
घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील परदेशी कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
१५ सदस्य एका छताखाली
शेती व शेतीपूरक व्यवसायातुन अनेकांना देतात रोजगार
त-हाडी :
मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. तर घरातील चुलीची जागा आधुनिक काळात गॅस सिलिंडरने घेतली आहे. मातीच्या भिंती पडत जावून सिमेंटचे जंगल तयार होत गेले आणि कुटुंबातील सदस्यांचे अंतर वाढू लागले. घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले.
मात्र शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील परदेशी कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.८५ वर्षीय कुटुंब प्रमुख माधव हसरत परदेशी यांनी आपल्या कुटुंबांना एका सुत्रात बांधून ठेवले आहे. शेती व शेतीपुरक व्यवसायातून आपल्या मुलांना व कुटुंबातील इतर सदस्यांना कर्तव्यावर सतत निर्विवाद कार्यरत ठेवण्याची संधी त्यांनी निर्माण केली. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पारिवारिक एकतेला प्रथम महत्त्व देत आपल्या वाट्याला आलेले कार्य आपले कर्तव्य म्हणून पार पाडतो. हीच परदेसी कुटुंबियांची मोठी ताकद म्हणावी लागेल. परदेशी कुटुंबात माधव परदेशी कुटुंब प्रमुख असून आज ते ८५ वषार्चे झाले तरी त्यांच्या मार्गदर्शन व सल्लाशिवाय घरात कुठलेही निर्णय घेतले जात नाही.
ते सुध्दा नेहमी आपल्या मुलाच्या सल्याची कधीही अवहेलना करीत नाही. त्यामुळे काम आणि निर्णय घेण्यात समन्वय साधण्यात नेहमी यश मिळते माधव परदेशी याची पत्नी कै .मालतीबाई माधव परदेशी ह्या ८० वर्षाच्या त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केले.होते या दोघांची चार मुले असुन यात सर्वात मोठा कै,मनोहर माधव परदेशी ५५ वषार्चा त्याची पत्नी ज्योतीबाई मनोहर ५० वषार्ची, दुसरा मुलगा प्रकाश परदेशी ५० वर्ष वयाचा त्याची पत्नी कल्पनाबाई परदेशी ४६ वर्ष वयाची, तिसरा मुलगा अरूण परदेशी ४८ वर्षाच्या आणि त्याची पत्नी साधना परदेशी ४३ वर्ष वयाची
चैथ्था मुलगा दिनेश परदेशी ४६ वर्षाचा , आणि त्याची पत्नी मिनाबाई परदेशी ४१वर्षाची असून चार हि मुलाना मुल बाळ आहेत. कै मनोहर परदेश आणि ज्योती परदेशी याच्या एक मुलगा आहे.
चेतन परदेशी (२८)नोकरी आहे, दुसरा मुलगा प्रकाश परदेशी यांना एक मुलगा एक मुलगी मुलगा निखिल परदेशी वय (२२) मुलगी कल्याणी परदेशी वय २४ विवाहीत आहे तसेत प्रकाश परदेशी हा किराणा व्यवसायी आहेत. किराणा व्यवसाय कार्य करण्याच्या व्यतीरिक्त नेहमी घरच्या शेतीवाडीकडे व इतर कामाकडे लक्ष देतात. अरूण परदेश आणि त्याची पत्नी साधना परदेश याची दोन अपत्ये असुन मुलगी अक्षरा परदेशी (१०) आणि मुलगा सौरभ परदेशी (१९) शिक्षण घेत आहेत. चौथ्था मुलगा दिनेश परदेशी व त्याची पत्नी मिनाबाई परदेशी याची दोन एक मुली एक मुलगा असुन मुलगा कर्णल परदेशी (१८), मुलगी दिपीका परदेशी (१०) यांचा समावेश आहे.
अरूण परदेशी वर्षभर शेतीच्या कामात लक्ष देत असुन खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी नेहमी प्रयत्न करतात. सध्या विभक्त कुटुंब पध्दतीत परदेशी यांचे संयुक्त कुटुंब आदर्श ठरत आहे.१५-२० लोकांना वर्षभर मिळतो रोजगार माधव परदेशी याचे कुटुंब उन्नत शेतीकरिता परिसरात ओळखले जाते. शेतीपुरक व्यवसाय सुद्धा मोठ्या जिद्द व करतात. शेती आणि शेतीपुरक व्यवसायाच्या माध्यमातुन गावातील आणि परिसरातील ३०-३५ महिला पुरूषांना नियमित रोजगार उपलब्ध करून देतात. यात दोन्ही हगांमात शेतीमध्ये जमिनीची मशागत शेतातील कापुस,मका, व कांदा कापणीची कामे करतात.
जागतिक कुंटुब दिवस –
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे परदेशी कुटुंब माधव परदेशी , प्रकाश परदेश, अरुण परदेशी, दिनेश परदेशी,







