राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक योग्य दिन साजरा
सांगोला (साहित्यभूमी प्रतिनिधी)- अनकढाळ (सांगोला) येथील राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा श्री.कोकरे पी. एस. सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक मध्ये मा.श्री जाधव पी. एस.(प्राचार्य). यांनी योग दिनाचे महत्व पटवून सांगितले, दररोज च्या धावपळीच्या जीवनात आपली शारीरिक यष्टी सुव्यवस्तीत ठेवण्यासाठी तसेच भविष्यातील होणारे आजार टाळण्यासाठी योगविध्या दैनंदिन करण्याचे गरजेचे आहे.
तदनंतर सर्व विध्यार्थी यांनी वेगवेगळ्या स्वरूपातील योग साधना केल्या तसेच सर्व विध्यार्थी यांनी इंग्रजी तथा मराठी अक्षरांमध्ये योग दिवस याची प्रतिकृती सादर केल्या. यावेळेस संचालक संभाजी कोकरे सर, संचालिका पल्लवी कोकरे मॅडम,पीआरओ आत्माराम काटे सर, यांच्या सोबत सर्व शिक्षक तथा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.







