• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कोणता झेंडा घेऊ हाती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला संभ्रमपुढाऱ्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्ते सैरभैर

माणगंगा by माणगंगा
July 5, 2023
in Uncategorized
0

कोणता झेंडा घेऊ हाती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला संभ्रम
पुढाऱ्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्ते सैरभैर


त-हाडी : राजकारणात वाटेल तेव्हा अचानक बदल होत आहेत, कोणता पुढारी कुणासोबत हेच नागरिकांना कळेनासे झाले आहे, त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. कुणाचा झेंडा हाती घ्यायचा कुणाचे पोस्टर लावायचे कोणत्या नेत्यासोबत जायचे असा विचार सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे, एका वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. परवाच्या या राजकीय भूकंपामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला दोघांचेही मुख्य कारण एकच सत्तेत सहभागी होणे. राजकारणात कधी काहीही होऊ शकत असल्याने शिवसेना फुटून एक वर्ष झाल्यानंतरही आजही शिंदे व ठाकरे गटातील पुढारी गट एक होतील या आशेवर आहेत,

शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही आनंद साजरा करण्यात आला नाही. आता तर राष्ट्रवादीही सोबत आली आहे कालपर्यंत एकमेकांवर चिकलफेक करून आरोपांच्या फैरी व खालच्या स्तरावर आरोप करणारे आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत, त्यामुळे सध्या राजकारणच अस्थीर स्वरूपाचे झाले आहे, कोणता पुढारी कुणासोबत हेच कळेनासे झाल्याने कार्यकर्ते गोंधळात पडून सैरभैर झाले आहे. आता कुणाचा झेंडा हातात घ्यायचा असा विचार कार्यकर्त्यांना सतावत आहे.


बहुपक्षीय सरकार
एका पक्षाची सत्ता होती त्यावेळी कार्यकर्त्याचा पुढारी एकच होता त्यासाठी तळमळीने काम केल्या जायचे त्यांच्याच वाढदिवशी बॅनर पोस्टर्स लावले जायचे त्यावेळी वेगळे वातावरण होते. आता मात्र कमालीची खिचडी झाली आहे आता एका पोस्टर व बॅनर्समध्ये सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांचे फोटो लावावे लागत आहेत त्यामुळे कार्यकर्त्याला एकाच कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही गटांना राजी करावे लागत आहे. काम असेल तर कोणत्या पुढार्‍याकडे जावे असा संभ्रम कार्यकर्त्यामध्ये आहे. परवाच्या झालेला राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.


अनाकलनीय राजकारण
कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या पुढार्‍या विरोधात आंदोलन करायचा आज तोच पक्ष सत्तेत सहकारी झाला आहे त्यामुळे कालपर्यंत सडकून टीका करणाऱ्या पुढार्‍यासोबत तोंड बंद करून राहावे लागत आहे. मुर्दाबाद करतानाच आता समर्थनार्थ जिंदाबादचे नारे ही लावावे लागणार आहे. राजकारणात कुणीही कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो असे म्हटले जाते. राष्ट्रवादी कालपर्यंत भाजप शिंदे गटा विरोधात रस्त्यावर आंदोलन करीत होते. आता त्यांना मात्र आपसूकच भाजप नेत्यांचे समर्थन करावे लागेल असे चित्र आहे. काँग्रेसमध्ये सध्या तरी गुडगुड सुरू आहे त्यांना आता रान मोकळे आहे एकंदरीत राजकारणातील या अनाकलनीय बदलामुळे व राजकीय स्वार्थामुळे कार्यकर्ते मात्र हवालदिल होत आहे.

Views: 160
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते.

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी "भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं" बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)